बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- 'मी मरतेय, माझा शोध घेऊ नका ' सायलीचे शेवटचे शब्द खरे ठरले- याबाबत सविस्तर वृत्त असे की सायली 16 नोव्हेंबर ला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. 16 नोव्हेंबर पासून बेपत्ता असणार्या 16 वर्षीय सायलीचा मृतदेह एका विहरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील असणार्या गोविंदवाडी शिवारात ही घटना उघडकीस आली आहे. शहरातील गणेश नगर भागात राहणार्या सायली कल्याण पारेकर (वय16) असे मृत मुलीचे नाव आहे. सायली ही 16 नोव्हेंबरला पहाटे घरातून निघून गेली होती. घरातून बाहेर पडताना सायलीने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. 'मी मरतेय, माझा शोध घेऊ नका, व कोणालाच जबाबदार धरू नका " अशी नोट लिहून ठेवली होती.
सायलीची सुसाईड नोट आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. तिच्या आई- वडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन सायली बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. तिच्या कुटूंबियांनी सर्वत्र शोधाशोध घेतला होता.
गोविंदवाडी शिवारात विहरीत एका मुलीचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला. स्थानिकांनी पोलिसांना तातडीने घटनेची माहिती दिली. हा मृतदेह सायलीचा असल्याचे समोर आले. सायलीचा मृतदेह आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सायलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा अधिक तपास गेवराई पोलिस करत आहेत.


No comments:
Post a Comment