पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार- विठ्ठल-रूक्मीणी मुखदर्शनाला आता रोज एक हजाराऐवजी दोन हजार भाविकांना आॅनलाईन दर्शनासाठी बुकींग करता येणार- याबाबत सविस्तर वृत्त असे की विठ्ठल-रूक्मीणीचे आता दि.18/11/2020 , बुधवार पासून एक हजाराऐवजी आता दोन हजार भाविकांना आॅनलाईन बुकींग करून दर्शन घेता येणार आहे. भाविकांनी केलेल्या या मागणीचा विचार करून मंदिर समितीने हा निर्णय घेतल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणी कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनिल जोशी यांनी दिली आहे.
कोरोना महामारीमुळे गेल्या आठ महिन्यांपासून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद केले होते. शासनाने याबाबत निर्बंध कमी केल्याने व मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात यावे अशी मागणी भाविकांनकडून, वारकरी संप्रदायाकडून सातत्याने होत होती. त्याची दखल घेत शासनाने राज्यातील सर्व मंदिरे ही भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
परंतु कोरोना च्या पार्श्वभूमीवर दक्षतेसाठी पदस्पर्श दर्शनाऐवजी मुख दर्शन सुरू करण्यात आले. आॅनलाईन बुकींग करून आलेल्या एक हजार भाविकांना मंदिरात दर्शनाला सोडण्यात येत होते.परंतु भाविकांची मागणी लक्षात घेता दि.18/11/2020 बुधवार पासून एक हजाराऐवजी आता दोन हजार भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
दररोज सकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दर तासाला सध्या शंभर भाविकांना मुखदर्शनाला सोडण्यात येत आहे. त्यात बुधवार पासून दुपटीने वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे दर तासाला दोनशे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. दहा वर्षा पेक्षा जास्त आणी 65 वर्षा पेक्षा कमी असलेल्या लोकांना आॅनलाईन दर्शन बुकींग करता येणार आहे. गरोदर महिलांना सध्या प्रवेशाला मनाई आहे. मंदीरात प्रवेश करत असताना प्रत्येक भाविकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार असून, हातावर सॅनिटायझर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
www.vithalrukminimandir.org/home.html या मंदीर समितीच्या संकेतस्थळावर आॅनलाईन दर्शन बुकींग करता येते.
ह्याव्यतिरिक्त http://117.214.89.131qms1 (सदरची लिंक Google Chrome, Mozila Firefox या वेब ब्राऊजर वरून काॅपी पेस्ट करावी)


No comments:
Post a Comment