मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हडपसर पोलिस स्टेशन मधील तपास पथकाने चोरीचे 12 गुन्हे उघडकीस आणले-*हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकाने ऐन दिवाळी सणाच्या काळात ५० पेक्षा जास्त घरफोडी चोरीचे गुन्हे असलेले रेकॉर्डवरील ०२ आरोपी व ०१ विधी संघश्रित बलकांकडून सोन्याचे दागिने व चांदीच्या विटा जप्त करून एकुण ०७ घरफोडी चोरीचे व ०५ चारचाकी चोरीचे असे एकूण १२ गुन्हे उघडकीस आणून असा एकूण २९,५५,२००/- रू.मुद्देमाल जप्त करून केली उत्तम कामगिरी*
*पुणे दि-१७ (समीर आतार)*
*(नवनाथ मोडक)*
पुणे शहरातील वाहन चोरी ,जबरी चोरी व घरफोडी चोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध करून चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे दृष्टीने हडपसर पोलीस स्टेशन चे कार्यक्षेत्रात हडपसर पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील अधिकारी पोलीस अंमलदार असे हडपसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक.:- १२/११/२०२० रोजी २०:३० वाजण्याच्या सुमारास गुन्हे प्रतिबंध पेट्रोलिंग फिरत असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन च्या रेकॉर्डवरील आरोपी हे म्हाडा कॉलनी हडपसर येथे थांबले आहेत. वगैरे मजकुरची बातमी मिळाल्याने लागलीच मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून इसम १) सनिसिंग पापासिंग दुधानी वय १९ वर्षे रा.बिराजदार नगर गल्ली न.५ हडपसर ,पुणे २) सोहेल जावेद शेख वय १९ वर्षे र. गोसावी वस्ती कॅनाल शेजारी, हडपसर ,पुणे यांना पकडून त्यांच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि.न.१५२९/२०२० भादविक ४५७, ३८०,३४ हा गुन्हा केला असल्याचे सांगत असल्याने त्यांना नमूद गुन्ह्यात दिनांक.:- १२/११/२०२० रोजी २१:३० वाजता अटक करून त्यांना मा. कोर्टात हजर केले असता मा. कोर्टाने दिनांक.:- १७/११/२०२० रोजी पोलीस कस्टडी ची रिमांड घेण्यात आली आहे.
रिमांड मुदतीत अटक आरोपी यांचेकडे सचोटीने व कौशल्य पुर्वक तपास करता त्यांचेकडे २५ ग्रम सोन्याचे दागिने, ३.५० किलो चांदीच्या विटा , दोन इको फोर व्हिलर , दोन सेंट्रो फोर व्हिलर , एक बोलेरो फोर व्हीलर असे एकूण ०७ घरफोडीचे व ०५ चार चाकी वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणून त्यांचेकडून एकूण किंमत रुपये २९,५५,०००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
सदर आरोपी कडून हडपसर पोलीस स्टेशन कडील ०५ गुन्हे , लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील ०२ गुन्हे असे घरफोडी चोरीचे तसेच वाहन चोरीचे दत्तवाडी पोलीस स्टेशन कडील ०१ गुन्हा , लोणीकंद पोलीस स्टेशन कडील ०१ गुन्हा, शिवाजी नगर पोलीस स्टेशन लातूर कडील ०१ गुन्हा असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत.सदर आरोपी हे हडपसर पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरील अट्टल चोरटे व गुन्हेगार असून त्यांच्याकडे हडपसर पोलीस अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.श्री.नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त ,पूर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा.नम्रता पाटील मॅडम , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ ५ पुणे शहर , यांचे मार्गद्शनाखाली मा.श्री.कल्याणराव विधाते , सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे , श्री.बाळकृष्ण कदम , वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर,राजू अडागळे पोलीस निरीक्षक गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन यांचे सूचनेप्रमाणे तपास पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक संजय चव्हाण,पोलीस हवालदार प्रताप गायकवाड ,प्रदीप सोनवणे , पोलीस नाईक विनोद शिवले , नितीन मुंडे, सौदोबा भोजराव , समीर पांडुळे,संदीप राठोड, पोलीस शिपाई शशिकांत नाळे,अकबर शेख, शहीद शेख,प्रशांत टोणपे, सचिन जाधव,प्रशांत दुधाळ,उमाकांत स्वामी,निखिल पवार,पो.ना.गोसावी यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
(श्री.बाळकृष्ण कदम)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक


No comments:
Post a Comment