Breaking

Wednesday, 7 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान-जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, झहीर खान खरा हिंदुस्तानी मुसलमान

झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. झहीर खान 2004 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाकिस्तानातील आघाडीचं दैनिक ‘डॉन’ने त्याची मुलाखत छापली होती.

यावेळी झहीरला बाळासाहेबांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. “तू भारतात – महाराष्ट्रात राहतोस. तिथे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे, याचा तुला एक मुस्लिम म्हणून काही त्रास होतो”? त्यावर झहीरने दिलेल्या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुखांसह तमाम शिवसैनिकांचा उर अभिमानाने भरून आला होता.
झहीर म्हणाला होता, ” शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिमविरोधी नाहीत. काही जणांनी स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेबांची इमेज ‘मुस्लिमविरोधी’ अशी बनवली आहे. मात्र भारतातील देशभक्त मुस्लिमांना ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही त्रास नाही. जे विध्वंसक कृतीमध्ये सहभागी असतात, त्यांनाच शिवसेनेचा विरोध आहे”.
झहीर खानच्या या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याला खरा हिंदुस्थानी मुसलमान म्हटलं होतं.
आज झहीर खान चा वाढदिवस,त्याला खुप खुप शुभेच्छा !

No comments:

Post a Comment