मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- नारायणगाव येथे खासदार कोल्हेनी तालुका प्रशासन व पत्रकार मित्रांशी संवाद साधला- नारायणगाव येथे खासदार अमोल कोल्हे आले असता त्यांनी तालुका प्रशासन व पत्रकार मित्रांशी संवाद साधला. यावेळी शिरूर लोकसभा मतदारसंघातील आरोग्यविषयक मुद्यांवर पत्रकारांशी चर्चा केली. #कोविड१९ चे उपचार योग्य पद्धतीने व दरात व्हावेत यासाठी यासंदर्भातील दर खासगी रुग्णालयात दिसतील असे लावावेत अशी सूचना केली. याशिवाय जिल्हा कोविड आरोग्य केंद्रात (DCHC) रुग्णाची तब्येत अधिक बिघडण्याची वाट न पाहता त्याला तातडीने पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवावे. तत्पुर्वी बेड व रुग्णालयाची उपलब्धता याची खातरजमा करावी असेही सांगितले. तालुका प्रशासनाने खाजगी कोविड सेंटरमधील रुगांच्या उपचार यंत्रणा, औषधपुरवठा व उपचार खर्चांची बिले याबाबत समन्वयक / शासकीय प्रतिनिधी ठेवावा असेही तालुका प्रशासनास सांगितले. तालुक्यातील नव्या रुग्णवाहिकांबाबत तालुका प्रशासन व जिल्हा परिषद सदस्यांनी वित्त आयोगाच्या निधीतून रुग्णवाहिका देण्याबाबत पाठपुरावा करावा असेही यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद,पुणे च्या धर्तीवर शासनाकडून येणाऱ्या दिशानिर्देशांबाबत तालुकास्तरावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधावा असे सुचविले. रेमडीसीव्हर इंजेक्शन्सबाबत तालुक्यातील वितरक व मेडिकल सेंटर यांच्या माध्यमातून ती रुग्णास तत्परतेने उपलब्ध करावी हे प्रकर्षाने नमूद केले. संशयित रुग्ण अँटीजन टेस्टिंगद्वारे निगेटिव्ह आलाच तर त्याला RT- PCR टेस्टिंगद्वारे पण तपासून खात्री करून, मगच त्याला घरी सोडावे, अशी सूचना केली. तालुका यंत्रणेस अडचण भासल्यास माझ्याशी फोनद्वारे थेट संपर्क साधावा असेही यावेळी सांगितले. रुग्ण केंव्हाही आला तरी त्याची अँटीजेन टेस्ट व्हावी असे सुचवितानाच लॅब टेक्निशियन्सची कमतरता भासू देणार नाही असा शब्दही तालुका यंत्रणेला दिला.


No comments:
Post a Comment