माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे- माढा तालुक्यातील मानेगाव येथील तलाठी के.जी.दळवी यांना गावातील काही राजकीय मंडळी हेतुपुरस्करपणे शासकीय कामात अडथळा आणून त्यांच्यावर शेतीशी संबंध नसणारे लोक पैसे मागत असल्याचे चुकीचे आरोप करीत आहेत. प्रामाणिकपणे काम करणार्या तलाठ्याबाबत खोट्या तक्रारी करीत आहेत, असे निवेदन शेतकर्यांनी तहसीलदार राजेश चह्वाण सो.यांना दिले आहे.
सोमवारी गावातील काही लोकांनी तहसीलदारांना तलाठी दळवी हे पैसे मागत असल्याची तक्रार केली होती, याच गावातील शेतकर्यांनी मंगळवारी निवेदन देऊन तलाठ्यावरती कसलाही पुरावा नसताना चुकीचे आरोप केले असल्याचे निवेदन तहसीलदार चह्वाण यांना दिले आहे. यावेळी निवेदन देताना सुशील पारडे, बाबासाहेब शेळके, नागनाथ भुसारे, नरेंद्र बारबोले, अलम जमादार, विलास कदम, दिपक देशमुख, भास्कर कदम, बब्रुवान करळे यांच्यासह 145 शेतकर्यांच्या स्वाक्षरी व उतार्यासह निवेदन दिले आहे.


No comments:
Post a Comment