Breaking

Tuesday, 6 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- आदिवासी अधिकार कार्यकर्ता नासरी चह्वाण यांचा वंचित मध्ये प्रवेश.


मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार-आदिवासी अधिकार कार्यकर्ता नासरी चव्हाण  यांचा 'वंचित'मध्ये जाहीर प्रवेश.

अकोला  - समाजकार्य क्षेत्रातील ४० अवार्ड मिळवणार्‍या, जैवीक शेती विषयी जर्मनी,फ्रान्स,स्वित्झर्लँड विदेशी दौरे करणार्‍या,पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आदिवासी भागात मोलाच काम करणाऱ्या आदिवासी भिलाला (राक्या) जमातीच्या नासरी शेकड्या चव्हाण यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व स्वीकारुन आज जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.

प्रवेशा वेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभाताई शिरसाट, जि प अध्यक्ष प्रतिभाताई भोजने,
जि प उपाध्यक्ष सावित्रीताई राठोड,अशोक दारोकार, गजानन गवई, अॅड नरेंद्र बेलसरे, गजानन दांडगे,सचिन शिराळे, हिरासिंग राठोड, प्रतिभाताई अवचार,
वंदनाताई वासनिक, विकास पवार,प्रा मंतोषताई मोहोळ,
विकास सदांशिव, गणेश सुरजुशे, विश्वजीत वानखडे आदि प्रामुख्याने उपस्थित होते..

No comments:

Post a Comment