*मनसेच्या वतीने बँड पथकाला अर्सेनिक औषधी, सॅनेटायझर, मास्क, अन्नधान्य किट चे वाटप*
*औरंगाबाद | दि. ३०*
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरातील गोर, गरीब, मजदूर तसेच रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची लॉकडाऊन काळात गैरसोय झाली. हाताला कामच नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने ही गरज ओळखून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे, शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, यांच्या हस्ते शहरातील वसंत भवन, मछली खडक परिसरातील सुलतान ब्रास बँड पथकांना अर्सेनिक औषधी, सॅनेटायझर, मास्क, अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांच्या पुढाकाराने हि मदत देण्यात आली.
यावेळी मनसेचे जिल्हा संघटक बिपीन नाईक, वैभव मिटकर, उमेश दीक्षित, विजय रिडलॉन, शेख नासेर, सुरेंद्र वाडेकर, मनोज भिंगारे, रवींद्र गायकवाड, कचरू वीर पाटील, क्षितिज हिवाळे, आदींची उपस्थितीती होती. लॉकडाऊन काळात शासनाच्या आदेशाने विविध लग्न, समारंभ विविध कार्यक्रमच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला होता. परिणामी बँड पथकाचा रोजगार ठप्प झाला होता. यामुळे अनेक वाद्य वाजविणाऱ्या सुलतान ब्रास बँड पथकातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली होती. यासाठी सुलतान ब्रास बँड चे वसीम मन्सुरी, अजय लोखंडे यांनी अशोक पवार यांना आपली अडचण सांगितली त्यांची ही अडचण लक्षात घेऊन त्यांना आपल्या कुटुंबाला जगवता यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुढाकार घेऊन वसंत भवन, मछली खडक येथील सुलतान ब्रास बँड पथकाला आर्सेनिक औषधी, सॅनेटायझर अन्नधान्य किट चे वाटप करण्यात आल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष अशोक पवार पाटील यांनी सांगितले. यापुढेही गरजू व्यक्तीला मदत आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करत राहणार असेही पवार म्हणाले.


No comments:
Post a Comment