Breaking

Thursday, 8 October 2020

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- सीबीआयच्या माजी संचालकाने घेतला गळफास.

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- सीबीआयच्या माजी संचालकाने घेतला गळफास- याबाबत सविस्तर वृत्त असे की सीबीआयचे माजी संचालक मणिपूर नागालॅडचे माजी गव्हर्नर अश्र्वनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. त्यांचा मृतदेह शिमला येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. शिमल्याचे पोलिस अधीक्षक मोहित चावला यांनी या संदर्भात माहीती दिली. गेल्या काही दिवसांपासून अश्र्वनी कुमार हे नैराश्याच्या गर्तेत होते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणी डाॅक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकार्यांसाठी ते एक आदर्श होते, त्यांचा मृत्यू अशाप्रकारे होणे ही एक दुखःद घटना आहे अशी प्रतिक्रिया मोहित चावला यांनी दिली आहे अश्र्वनी कुमार हे आॅगस्ट 2006 ते 2008 या कालावधीत हिमाचल प्रदेशचे डिजीपी होते.

No comments:

Post a Comment