Breaking

Thursday, 1 October 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- दि.29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चा ची राज्य सरकारशी चर्चा संपन्न.


*दि.२९सप्टेंबर २०२०रोजी मुंबई येथे मराठा क्रांती मोर्चाची राज्य सरकारशी चर्चा संपन्न:-*

   छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांशी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष मा ना.अशोक चव्हाण यांची विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.बैठकीत सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढा,ईडब्ल्यूएस आरक्षण,एमपीएससी परीक्षा व नोकर भरती प्रक्रिया थांबविणे,आदी विषयांवर सविस्तर विचारविनिमय झाला.मराठा समाजास EWS आरक्षण नको,मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लागत नाही तोपर्यंत एमपीएससीच्या परीक्षा व नोकर भरती थांबविण्यात यावी.मराठा विद्यार्थ्यांची चालू वर्षातील शैक्षणिक हाणी टाळण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीतील शैक्षणिक अभ्यासक्रमांत १२% (Super Numerory Seats) जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी तात्काळ वाढविण्यात याव्यात.तसेच 9/9/2020,सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशापूर्वी सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया व नोकर भरतीमधील मराठा उमेदवारांना तात्काळ लाभ देण्यात यावा.आदी मागण्यांवर सर्वांची सहमती झाली.
     युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी वरील मराठा क्रांती मोर्चाची भूमिका मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचेशी समक्ष चर्चेत मांडली.यावेळी ईडब्ल्यूएस(EWS)जीआर न काढण्याचा निर्णय घेण्यात आला.वरील इतर मागण्यांबाबत सर्व कायदेशीर चाचपणी करून निर्णय घेण्याबाबत सरकारकडून आश्वासित करण्यात आले.
    जय शिवराय!
--

No comments:

Post a Comment