*नगरसेविका मेनका राठोड कोरोना महायोद्धा पुरस्कार ने सन्मानित*
सोलापूर -प्रभाग क्रमांक 23 च्या धडाकेबाज नगरसेविका मेनका राठोड यांनी जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून आपल्या प्रभागात मोठया प्रमाणात विकासाची कामे केली असून राजकारण ऐवजी सर्व सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून एकच ध्यास प्रभागाचा विकास मनोमनी ठेऊन नवा आदर्श निर्माण केला असून कोरोना हा रोग जीवघेणा व धोकादायक असल्याचे माहिती असताना देखील आपला जीव धोक्यात घालून प्रसंगी आपले कुटुंब बाजूला सारून एक महिला काय करू शकते हे आपल्या कामातून त्यांनी सिद्ध केल आहे नगरसेविका मेनका राठोड यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना कोरोना बाबत जनजागृती करून अनेकांची वेगवेगळ्या भागात तपासणी करून नागरिकांना दिलासा दिला आहे अश्या धाडसी निर्भीड अन रणरागिणी ला त्यांच्या कार्याची दखल घेऊन पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्या हस्ते कोरोना महायोद्धा पुरस्कार, सन्मान पत्र व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला
सत्काराला उत्तर देताना नगरसेविका मेनका राठोड यांनी आपण प्रभागात केलेल्या कामाची माहिती देऊन नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असून त्यांच्यासाठी आपण सदैव दक्ष व जागृतपणे काम करत असल्याची माहिती उपस्थित पत्रकारांना दिली
यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार वैजिनाथ बिराजदार राजाभाऊ पवार, अरुण सिडगिड्डी अक्षय बबलाद बिपीन दिड्डी भास्कर अल्ली, सतीश बलमेरी, श्रीनिवास पेद्दी प्रदीप पेंदापल्लीवार, देडे, इम्तियाज अक्कलकोटकर, डॉ रवींद्र सोरटे, वहाब होटगीकर जयप्रकाश पेद्दी पद्मिनी येळणे, अंबादास येलगेटी अमर सिंह गायकवाड शिवयोगी निंबाने, तानाजी माने बाबा काशीद इत्यादी पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते
No comments:
Post a Comment