Breaking

Saturday, 19 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी / अमीर आतार- प्रखर संघर्षाशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत- संतोष म्हेत्रे.


*प्रखर संघर्षशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत* संतोष म्हेत्रे 
सोलापूर( -प्रतिनिधी ) पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत 
*पत्रकार संरक्षण कायदा, जेष्ठ पत्रकारांना समान पेन्शन, पत्रकारांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांची स्वतंत्र चौकशी, राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी, यादीवर नसलेल्या सर्वचं वृत्तपत्र ला शासकीय जाहिराती मिळने, कोरोना काळात मृत्यू पावलेल्या पत्रकारांच्या कुटूंबाला तात्काळ पन्नास लाख रुपये मदत देणे, यासह पत्रकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली *पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी पत्रकार सुरक्षा समिती कटिबद्ध असून पत्रकारांच्या प्रश्नाबाबत प्रखरसंघर्ष करावा लागेल त्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत* असे प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांनी केले असून ते पत्रकारांच्या बैठकीत बोलत होते 
*पत्रकारांसाठी नेहमीच आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मोठा लढा उभा करणारी पत्रकार सुरक्षा समिती असून  आपण संघटित असाल तरच आपले प्रश्न सुटतील*  -जेष्ठ पत्रकार डॉ रवींद्र सोरटे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या असून आता पत्रकारांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागेल असा राज्य सरकार ला डॉ रवींद्र सोरटे यांनी  इशारा  दिला आहे  या बैठकीला प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पवार, शहर अध्यक्ष अरुण सिडगिड्डी शहर संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार, उपाध्यक्ष प्रभाकर एडके अक्षय बबलाद, सोड्डप्पा पेद्दी, सतीश बलंमेरी, इरण्णा अलवाल, प्रदीप पेंदापल्लीवार, शिवयोगी निंबाने, भास्कर अल्ली, लक्ष्मण गणपा, अलीम शेख, मोहंमद इंडिकर, आन्सर तांबोळी, इम्तियाज अक्कलकोटकर, विश्व्जीत कारंडे, प्रसाद ठक्का, इस्माईल शेख, नागेश बंडी, रामचंद्र चक्राल, सतीश गडकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment