Breaking

Tuesday, 8 September 2020

संपादक/ विजयकुमार परबत- मोडनिंब मधील आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी ठरतेय पर्यटनाचे केंद्र.


संपादक / विजयकुमार परबत- मोडनिंब मधील आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी ठरतेय पर्यटनाचे केंद्र- याबाबत सविस्तर वृत्त असे की मोडनिंब येथील आंबेडकर नगर येथील स्मशानभूमीत गेले 2 महिन्यांपासून सुशोभिकरणाचे काम मोडनिंब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मा.नागनाथ नाना ओहोळ यांच्या देखरेखीखाली सुरू आहे, VBP NEWS नी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता आम्हाला तेथे स्मशानभूमीपरिसरात संपूर्ण कॉंक्रिटीकरण केलेले दिसून आले या कॉंक्रीटीकरणामुळे तेथे चिखल होणार नाही त्यामुळे तेथे आलेल्या लोकांना व्यवस्थित तेथे ऊभे राहता येईल, वावरता येईल व वृद्ध लोकांना बसण्यासाठी तेथे सिमेंटची बाकडीही ठेवण्यात आली आहेत तसेच आंबेडकर नगर मधून निघल्यापासून ते स्मशानभूमीपर्यंत कॉंक्रिटचा रस्ता बनवण्यात आला आहे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला ते स्मशान भूमी पर्यंत व स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली  आहेत ती जणू काही स्मशानभूमीची शोभा वाढविण्याचे काम करत आहेत व तेथे रात्री अपरात्री लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सौरऊर्जेचे दिवेही बसविण्यात आले आहेत, तेथे असणारी वृक्ष, बसण्यासाठी बाकडी, दिवे, परिसरात केलेले कॉंक्रिटीकरण व आंबेडकर नगर पासून ते स्मशानभूमी पर्यंत असलेला कॉंक्रिटचा रस्ता व तेथे गेल्यानंतर मनाला मिळणारा आनंद द्विगुणीत करून जातो व आपण जणू काही एखाद्या पर्यटन स्थळी भेट देण्यासाठी आलो आहोत असा भास तेथे येणार्या प्रत्येक व्यक्तीला होतो,   मोडनिंब चे माजी सरपंच मा. नागनाथ नाना ओहोळ व त्यांचे सर्व कार्यकर्ते गेले 2 महिने झाले यासाठी विशेष लक्ष देऊन काम करत आहेत आणी त्यांनी खरोखरच जिल्ह्याला आदर्श घेण्यासारखे काम करून जिल्ह्यात अशी आदर्श स्मशानभूमी मोडनिंब मध्ये उभा केली आहे व ती प्रत्येकाला आकर्षणाचे केंद्र ठरत आहे व याबाबत आम्ही मोडनिंब चे माजी सरपंच मा. नागनाथ ( नाना) ओहोळ यांना विचारले असता त्यांनी असे सांगितले की प्रत्येकाने जर निस्वार्थी भावनेने काम केले तर ते उत्तम होते व त्याचा सर्व समाजघटकांना फायदा होतो, नानांच्या प्रयत्नातून व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्याला आदर्श घेण्यासारखी स्मशानभूमी व पर्यटन स्थळ, निसर्गरम्य असे ठिकाण मोडनिंब आंबेडकर नगर येथे तयार झाले आहे, खरोखरच हा नानांचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून काम करण्यासारखा आहे.

No comments:

Post a Comment