सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शेटफळ ता.मोहोळ येथे डेलिकेटेड कोह्वीड रूग्णालय ह्वावे अशी मोडनिंबच्या सहयोग मित्र परिवारची जिल्हाधिकारी यांचेकडे मागणी- याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या ग्रामीण भागात कोरोना चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आहे आणी त्यातल्या त्यात माढा, मोहोळ या तालुक्यात कोरोना झपाट्याने वाढत असल्याने, रूग्णांचे उपचाराविना हाल होत आहेत तसेच रूग्णांना कुर्डूवाडी, बार्शी, सोलापूर येथे उपचारासाठी जावे लागते परंतु तेथेही सध्या बेड शिल्लक नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत तरी रूग्णांना खाजगी उपचार घेणे परवडत नसून खाजगी दवाखान्याची बिले ही अव्वाच्या सव्वा वाढवून येतात त्यामुळे सर्व सामान्य लोकांना, गोरगरीबांना ते परवडत नाही त्यामुळे मौजे शेटफळ हे गाव माढा व मोहोळ तालुक्यातील मध्यठिकाणी व केंद्र असल्याने या ठिकाणी रूग्णांसाठी आॅक्सीजन व ह्वेंटीलेटरची सोय होवू शकते, सध्या या दवाखन्यात 1 एम.डी व 2 एम. बी. बी.एस डाॅक्टरांची नियुक्ती आहे व तेथे 108 अॅम्ब्युलन्स चे बेस लोकेशन असल्याने रूग्णांवरती तातडीने आणून उपचार होवू शकतात, तरी सध्या या दवाखन्यात 30-40 बेडची सोय आहे तरी या ग्रामीण भागातील रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून मोडनिंब येथील सहयोग मित्र परिवाराचे राजेश निंबाळकर यांनी एक सह्यांची मोहीम राबवत व निवेदनाद्वारे शेटफळ येथे डेलिकेटेड कोह्वीड रूग्णालय ह्वावे अशी जिल्हाअधिकारी यांचेकडे मागणी केली आहे अशी माहीती सहयोग मित्र परिवाराचे राजेश निंबाळकर व त्यांच्या सहकार्यांनी VBP NEWS ला दिली.
Monday, 7 September 2020
Home
/
सोलापूर
/
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शेटफळ ता मोहोळ येथे डेलिकेटेड कोह्वीड रूग्णालय ह्वावे अशी सहयोग मित्र परिवाराची जिल्हाअधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी.
सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - शेटफळ ता मोहोळ येथे डेलिकेटेड कोह्वीड रूग्णालय ह्वावे अशी सहयोग मित्र परिवाराची जिल्हाअधिकारी यांचे कडे निवेदनाद्वारे मागणी.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment