Breaking

Wednesday, 9 September 2020

संपादक/ मनसेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांतजी गिड्डे साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याने राहूल सुर्वे यांचा अन्नत्याग व महापूजेचे आयोजन.


संपादक/ विजयकुमार परबत- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांतजी गिड्डे साहेब यांना कोरोनाची लागण झाल्याने राहूल सुर्वे यांचा अन्नत्याग व महापूजेचे आयोजन- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. प्रशांतजी गिड्डे साहेब हे नेहमीच आपल्या खास शैलीत प्रत्येक कार्यकर्त्यांची कामे करत असतात व कोणत्याही कार्यकर्त्याला ते रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत व त्यामुळेच त्यांच्यावरती अनेक कार्यकर्ते मनापासून प्रेम करतात अशातच सध्या त्यांना ते सतत लोकांच्या संपर्कात असल्याने त्यांना कोरोनाची लागण झाली आहे व या कोरोनातून ते लवकरात लवकर बरे ह्वावे यासाठी त्यांचा एक सहकारी व परम मित्र तसेच कार्यकर्ता व मनसेचे माढा तालुकाध्यक्ष राहूल सुर्वे यांनी ते बरे होईपर्यंत अन्न व पाणी त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे व ते अध्यक्षांनी लवकर बरे होण्यासाठी एका महापूजेचे आयोजनही करणार आहेत अशी माहिती VBP NEWS शी बोलताना मनसेचे माढा तालुकाध्यक्ष राहूल सुर्वे यांनी दिली.

No comments:

Post a Comment