Breaking

Thursday, 3 September 2020

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमीर आतार- हुलजंती येथील बेकायदेशीर असलेले अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी मा.मिलिंद शंभरकर यांना जनकल्याण फाऊंडेशन चे निवेदन.


हुलजंती येथील बेकायदेशीर अतिक्रमण झालेले काढण्याकरता जिल्हाधिकारी  यांना 'जनकल्याण फाउंडेशन' तर्फे निवेदन.                                         हुलजंती प्रतिनिधी.  मंगळवेढा तालुका येथील पश्चिम भागात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून हुलजंती ओळखले जाते गेली 10 ते 12 वर्षे झाले गावातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी  यांनी आवाच्या सव्वा रक्कम घेऊन  हुलजंती गावठाण व येथील सरकारी जमिनी लोकांच्या नावाने बेकायदेशिर नावे केले आहेत . गावातील तीस-चाळीस टक्के तरुण सुशिक्षित बेकार असून त्यांनी ग्रामपंचायत कडे व्यवसायासाठी जागेची मागणी करतात .परंतु ग्रामपंचायत त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू उदरनिर्वाह करण्यासाठी जागा देत नाही  . विचारल्यास गावांमध्ये जागा उपलब्ध नसल्याचे सांगतात . परंतु गावाबाहेरील नातेवाईक पाहुने यांना मात्र जागा उपलब्ध कशी होते .हुलजंती येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला मान्यता मिळाली असून तो जागेअभावी प्रलंबितच आहे.या प्राथमिक आरोग्य केंद्राला जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. काही तरुण ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जागा देत नसल्याकारणाने जन कल्याण फाउंडेशनच्यावतीने 03.09.2020 रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी सोलापूर जिल्हा ग्राहक मंच अध्यक्ष श्रीकांत सोमुत्ते (वडीयार), ग्राहक मंच तालुका अध्यक्ष अमोल कोरे . युवा नेते मारुती पेटर्गे,   सुनिल सोमुत्ते, सिद्धेश्वर पेटर्गे, ,महेश भोरकडे, दशरथ पेटर्गे,  महेश पेटर्गे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते. मा. जिल्हाधिकारी यांना सुशिक्षित बेकारांना न्याय मिळवून द्यावा असे आव्हान केले आहे.

No comments:

Post a Comment