Breaking

Friday, 4 September 2020

संपादक/ मोडनिंब येथील युनियन बॅंकेतील पासबूक छापाई मशीन कोरोना मुळे बंद, खातेदारांचे होतायत हाल.

संपादक/ मोडनिंब येथील युनियन बॅंकेतील पासबूक छापाई मशीन कोरोना मुळे बंद, खातेदारांचे होतायत  हाल- याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजे मोडनिंब येथील युनियन बॅंकेतील पासबूक छापाई मशीन कोरोनाचा प्रादूर्भाव असल्यामुळे बंद ठेवण्यात आले आहे, त्यामुळे सध्यस्थितित खातेदारांना त्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले, किती कट झाले याबाबतची माहिती मशीन बंद असल्याने माहिती होत नाही, किंवा एखाद्या खातेदारास महत्वाच्या कामासाठी पुस्तक छापून पाहिजे असल्यास, बॅंकेतील अधिकार्यांकडे याची मागणी केली असता ते छापून भेटत नाही, जेव्हा मशीन चालू होईल तेव्हा आपण मशीन मधूनच छापून घ्या असे सांगण्यात येते याबाबत संघर्ष बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद नागटिळक यांनी बॅंकेतील अधिकार्यांकडे संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की आम्ही फक्त खात्यावर किती पैसे आहेत एवढीच माहीती तोंडी देवू शकतो असे अधिकार्यांनी सांगितले, याबाबत विनोद नागटिळक यांनी अधिकार्यांना आपण या समस्येबाबत आपल्या वरिष्ठांकडे संपर्क साधला आहे का असे विचारले असता त्यांनी असे सांगितले की आम्ही याबाबत वरिष्ठांकडे कोणताच पत्र व्यवहार केला नाही परंतु आता सध्या बर्याच प्रमाणात कोरोना कमी झालेला आहे त्यामुळे आम्ही बॅंक पासबूक छापाई मशीन चालू करण्यासाठी वरिष्ठांशी संपर्क करून मशीन लवकरात लवकर सुरु करू असे बॅंक अधिकार्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment