Breaking

Sunday, 14 November 2021

माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - जबाबदारी झटकणारा नाही तर जबाबदारी स्विकरणारा नेता रणजितदादा....योगेशराव संजय मोरे.


जबाबदारी झटकणारा नाही जबाबदारी स्विकारणारा नेता *रणजितदादा* 
पक्ष कोणताही असो पण नव्या पिढीतील सोलापूर जिल्ह्य़ाचा एक कर्तृत्ववान नेता म्हणजे *रणजितदादा* 
       सोलापूर जिल्ह्य़ातील राजकारणात अथवा पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात नव्या फळीतील सहकार क्षेत्रातील अनुभव असलेला ,स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नस ना नस माहिती असलेला ,जय पराजयात संयमाने लढणारा असा एक अष्टपैलु राजकारणी म्हणजे *रणजितसिंह मोहिते पाटील*
          सत्तेत असो वा सत्तेच्या बाहेर ,सत्तेत असतानाही राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष असताना त्यांच्या नेतृत्वाचा झंझावात अख्या महाराष्ट्राने पाहिला,यवकांचं आकर्षण म्हणून रणजितदादांकडे पाहिलं जायचं,स्वतः पवारसाहेबांनीही रणजितदादांच्या नेतृत्वाचं कौतुक करत "मला राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही" असे उद्गार काढले होते,खासदार असतानाही चावडीला निधी न देता ग्रंथालयाला, व्यायामशाळेला, क्रिडांगणाला निधी देऊन आपल्या विकासमय नेतृत्वाची ओळख करून दिली,पण काही काळानंतर काही कारणामुळे त्यांनी पक्षांतर केल्यापासून जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या निवडणुकीत म्हणजे लोकसभा असो ,विधानसभा असो ,जिल्हापरिषद असो वा पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक असो रणजितसिंह मोहिते पाटील यांची एक कायम वेगळी छबी सोलापूर जिल्ह्य़ातील लोकांना अनुभवायला मिळाली,कोरोना काळातही त्यांनी सर्वच तालुक्यात जबाबदारीची कामगिरी केली व पक्षांतर करताना जनतेला दिलेला शब्द म्हणजे अडगळीत पडलेला *शंकर सहकारी साखर कारखाना* व त्यामधे दबलेले शेतकरी यांना त्या संकटातून सुखरूप बाहेर काढून योग्य दिशेने वाटचाल करणाऱ्या कुशल नेतृत्व रणजितदादांना पुढील वाटचालीस शुभेच्छा
-योगेशराव संजय मोरे

No comments:

Post a Comment