Breaking

Wednesday, 10 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडच्या विशाल जाधव ची क्लवालिटी किऑस्क कंपनीत निवड.


*पंढरपूर सिंहगडच्या विशाल जाधव "क्लवालिटी किऑस्क" कंपनीत निवड*

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या विशाल हरिदास जाधव यांची "क्लवालिटी किऑस्क" या कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
    "क्लवालिटी किऑस्क" हि कंपनीचे अमेरिका, सिंगापूर, दुबई, अबुधाबी, फिलिपिन्स, मलेशिया, इंडोनेशिया व भारतात "क्लवालिटी किऑस्क" या कंपनीचे ऑफिस आहेत. हि कंपनी भारतातील मुंबई आणि बेंगलोर येथे कार्यरत असुन इन्शुरन्स साॅफ्टवेअर टेस्टिंगमध्ये जगातील नामांकित कंपन्यापैकी एक आहे. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकीत महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या विशाल हरिदास जाधव यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. कंपनीकडून विशाल जाधव यांना ३ लाख रूपये वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
    "क्लवालिटी किऑस्क" या कंपनी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment