कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२१ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केलेल्या ६ विद्यार्थ्यांची जगात नामवंत असलेल्या एक्सेंचर कंपनीत कॅम्पस मुलाखीद्वारे निवड करण्यात असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधितच नावलौकिक संपादित करून अभियांत्रिकी शिक्षणाची गुणवत्ता, जगातील नामांकित कंपनीत विद्यार्थ्यांना नोक-या देऊन पंढरपुर सिंहगड महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात दमदार वाटचाल केली आहे. सिंहगड संस्थेतील शिक्षक विद्यार्थ्यांना तन-मन-धनाने ज्ञान दानाचे काम करीत आहेत. गुणवत्ता पुर्ण शिक्षण हेच सिंहगड संस्थेचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणा-या संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती असून इंजिनिअरचा किंगमेकर, स्टार इंजीनियर तसेच स्मार्ट महाविद्यालय स्मार्ट इंजिनियर फक्त पंढरपूर सिंहगड मध्ये घडविले जातात. म्हणूनच आज सिंहगड मधील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात नामांकित कंपनीत निवडले जात आहे.
जगातील दहा कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या एक्सेंचर आयर्लंड येथील परदेशीय कंपनीत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सुमेध कुलकर्णी, वैभवी कुलकर्णी, मैथली महाकोडे, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील राहुल अभंगराव, सौरभ देवमारे आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील ऋतुजा घोलप आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एक्सेंचर कंपनीकडून ४.५० लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना नोकरी मिळत असल्याने पालक वर्गात आनंदी वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
एक्सेंचर कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


No comments:
Post a Comment