Breaking

Friday, 12 November 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - सिंहगडच्या 2 विद्यार्थ्यांची स्टेटिग कन्सल्टींग कंपनीत निवड.


*पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थ्यांची "स्टेटिग कन्सल्टींग" कंपनीत निवड*
कोर्टी (ता. पंढरपुर) सारख्या ग्रामीण भागात उभारण्यात आलेल्या सिंहगड इन्स्टिट्युटने अल्पावधीतच सोलापुर जिल्ह्यातच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात आपली वेळी ओळख निर्माण केली आहे. अभियांत्रिकी शिक्षणात वैभवशाली शैक्षणिक संकुल असल्याचे सिद्ध केले आहे. पंढरपुर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणजे अभियांत्रिकी शिक्षणाचा महामेरू आहे. उत्कृष्ट शिक्षण प्रणाली, तज्ञ प्राध्यापक वर्ग, निकालाची उज्ज्वल परंपरा आहे.  विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता सामाजिक बांधिलकी, सामाजिक भान, राष्ट्राच्या, समाजाच्या हितासाठी, उन्नतीसाठी व प्रगती कडे घेऊन जाणारे शिक्षण पंढरपुर सिंहगड मध्ये दिले जात आहे. अशा या महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची "स्टेटिग कन्सल्टींग प्रा. लिमिटेड" कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत यांनी दिली.
"स्टेटिग कन्सल्टींग प्रा. लिमिटेड" कंपनी ही भारतातील पुणे येथे कार्यरत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग मानके, वेळेवर आणि दर्जेदार वितरण, अनुभवी कर्मचारी हे या कंपनीचे खास वैशिष्ट्य आहे. अशा या कंपनीत सिंहगड महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील कुमारी नेहा करपे आणि प्रथमेश जाधव या दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड करण्यात आली आहे.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक ३ लाख रूपये वार्षिक पगार मिळणार आहे.
"स्टेटिग कन्सल्टींग प्रा. लिमिटेड" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. संपत देशमुख, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. समीर कटेकर, प्रा. अभिजित सवासे, प्रा. योगिनाथ कलशेट्टी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment