Breaking

Wednesday, 3 November 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - 10 नोव्हेंबर रोजी होणार्या ग्रामसभेत सर्व मोडनिंबकरांनी सहभाग नोंदवावा....प्रा. जयवंत समुद्र सर यांचे आवाहन.


"समस्त मोडनिंब ग्रामस्थांना नम्र आवाहन..."
 सर्व मोडनिंबकर बंधुभगिनींना दिपावलीच्या
              हार्दिक शुभेच्छा..!
सस्नेह नमस्कार,
मोडनिंब ग्रा.पं.च्या वतीने बुधवार दि.१० नोव्हे.
रोजी स.११ वा.ग्रामसभेचे आयोजन करण्यात
आले आहे.खरंतर ग्रामसभेत भाग घेणे व यात
आपल्या हिताचे निर्णय मंजुर करण्याचा हक्क
आपणांस मिळाला आहे.ही ग्रामसभा यासाठी
महत्वाची आहे की,यामध्ये मोडनिंब ग्रा.पं.चे
नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा ऐतिहासिक
ठराव मांडण्यात येणार आहे.आपण सर्वजण
आपल्या अपेक्षा,मागण्याबद्दल जागरुक असतो
परंतु यासाठी सहभागी मात्र आपण होत नाही.
ग्रामसभेतली मंजुरी ही अत्यंत महत्वाची असते.
    मोडनिंबचा विस्तार आज चारही बाजुने होत
आहे.जवळपास ३००० घरे व १०,००० पेक्षा
जास्त लोकवस्तीला ग्रामपंचायत योग्य प्रकारे
भौतिक सुविधा पुरवु शकत नाही.याचे मुख्य
कारण निधीची कमतरता,अपुरे मनुष्यबळ हे 
आहे.अत्यंत मर्यादित स्वरुपात व ठराविक हेड
अंतर्गत निधी खर्चावा लागतो.त्यामुळे वारंवार 
लोकप्रतिनिधी , ता.प,जि.प.कडे निधीसाठी
मागणी करावी लागते.परंतु या सर्वातुन आपला
विकास करुन घ्यावयाचा असेल तर सध्याचे
स्वरुप बदलणे गरजेचे आहे.आज अकलुज
सारख्या मोठ्या ग्रा.पं.चे रुपांतर झाले आहे.
टेंभुर्णी.अनगर,वेळापुर या ग्रा.पं.तीनी राजकीय
बळ वापरुन मंजुरी आणली आहे .कारण याचे
फायदे समोर येवु लागले आहेत.कारण.
१)प्रशासनाला कायमस्वरुपी स्वतंत्र अधिकारी          
     मिळेल
२)सर्व खाती.उदा.पाणी,स्वच्छता,आरोग्य,वीज,   
    शिक्षण,दळववळण,सार्वजनिक वितरण
   याला स्वतंत्र अधिकारी व सभापती मिळेल.
३)महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याकडुन
   थेट निधी.
४)रस्ते व सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी
   स्वतंत्र योजनेचा लाभ.
५)कचरा उचलणे,निर्मुलन यासाठी केंद्रसरकार
   स्वतंत्र सहाय्य करते.
६)मिळकत कराच्या वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष व
   सक्षम अधिकारी याशिवाय मिळकत कर 
   किती असावा याचे अधिकार.
६)प्रत्येक वाॅर्डाला अनुशेषानुसार निधी
७)सर्वात महत्वाचे म्हणजे नगराध्यक्ष व सभासद
   विधानपरिषद निवडणुकीस मतदार
८)नगराध्यक्ष व सभापतींना स्वतंत्र वाहने..
       असे एक ना अनेक फायदे होणार आहेत.
प्रशासन भक्कम असेल,स्वतंत्र इमारत मिळेल.
तरी सर्व पक्षीय राजकीय नेतेमंडळी,नागरिक,
व्यापारी,पत्रकार यांना नम्र विनंती आहे की,
ग्रामसभेमध्ये "मोडनिंब ग्रामपंचायतीचे रुपांतर
नगरपंचायतीत होण्यासाठी एकमताने ठराव
करावा,यासाठी सर्वांनी वेळात वेळ काढुन
ग्रामसभेत उपस्थित राहुन या ऐतिहासिक घटनेला पाठींबा द्यावा....!
      "सर्वांचाच ध्यास,मोडनिंबचा विकास.."
धन्यवाद..
जयवन्त समुद्र सर
मोडनिंब

No comments:

Post a Comment