सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद, पंचायत व ग्रामपंचायत या त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावर नावलौकिक मिळवणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा तसेच यशवंत पंचायत राज अभियानात तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी यांचा व राज्य शासनाचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आणि राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पिंपळनेर ता. माढा येथील ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब पाटील यांचा सत्कार समारंभ पंचायत समिती कुर्डवाडीच्या विठ्ठलराव शिंदे सभागृहात सोमवारी अकरा वाजता आ.बबनदादा शिंदे व आ.संजयमामा शिंदे यांच्या हस्ते आयोजन करण्यात आल्याची माहिती राज्य ग्रामसेवक संघाचे माढा तालुकाध्यक्ष शिवाजी लोकरे यांनी दिली.
जि.प. चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, ईशाधिन शेळकंदे, स्मिता पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती रणजितसिंह शिंदे, माजी उपसभापती तुकाराम ढवळे, सभापती विक्रमसिंह शिंदे, उपसभापती धनाजी जवळगे, गटविकास डॉ. संताजी पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन ग्रामसेवक संघाचे माढा तालुका सचिव प्रताप गवळी यांनी केले आहे.


No comments:
Post a Comment