Breaking

Monday, 11 October 2021

करकंब प्रतिनिधी/ संजय काळे - कांशीराम साहेबांनी बहुजन युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केली....प्रा.यशवंत बडेकर सर.


करकंब प्रतिनिधी कांशीराम साहेबांनी बहुजन युवकांमध्ये प्रेरणा निर्माण केले - प्रा.यशवंत बडेकर सर
बहुजन सत्यशोधक संघ या सामाजिक संघटनेच्या वतीने करकंब येथे मान्यवर कांशीराम साहेब यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रा. यशवंत बडेकर हे प्रमुख वक्ते म्हणून होते,
ते म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय समता बंधुभाववर समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी संविधान लिहून भारतातील सर्व जातीधर्माच्या लोकांना समान हक्क अधिकार दिले, कांशीराम साहेबांनी सामाजिक बरोबर राजकीय क्रांती केली, परंतु आज खाजगीकरण उदारीकरण भूमंडलीकरण यामुळे युवक बेरोजगार होत आहे,  युवकांनी स्पर्धेच्या युगात उच्च व प्रोफेशनल एज्युकेशन घ्यावे व फुले-शाहू-आंबेडकर अण्णाभाऊ साठे महापुरुषांचे विचार प्रत्येक घरामध्ये पोहचवावेत कारण विचार परिवर्तन ही जगातील सर्वात मोठे परिवर्तन आहे असे प्रा. बडेकर म्हणाले,
यावेळी प्रा.शंकर गायकवाड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील ओहोळ यांनीही आपले विचार व्यक्त केले, यावेळी बहुजन सत्यशोधक कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शिंदे,
पश्चिम महाराष्ट्र सदस्य अनिल सरवदे, जिल्हा उपाध्यक्ष नितीन वाघमारे. पंढरपूर तालुका अध्यक्ष दिलीप सुर्वे ,करकंब अध्यक्ष रवी धोत्रे,सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत जळगाव,आबासाहेब पाटोळे, महादेव गाडे,माढा युवक अध्यक्ष  सुरेश वाघमारे, दिलीप गजघाटे,अरुण शिंदे, तालुका उपाध्यक्ष लखन वाघमारे,  भेंड शाखा अध्यक्ष महेंद्र शिंदे, बालाजी जानराव, संतोष वाघमारे, खंडू वाघमारे,संजय वाघमारे यावेळी बहुजन समाजातील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment