Breaking

Saturday, 2 October 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - कराड- पाटण मार्गावर दुचाकीच्या अपघातात एकजण जागीच ठार.


*कराड*-  *पाटण मार्गावर* *दुचाकीच्या* *अपघातात* *एकजण* *जागीच* *ठार* 
  कराड - पाटण मार्गावर विहे येथे रस्त्याच्या संरक्षण कठड्याला जोराची धडक बसल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत असलेला 15 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
घटना गुरुवारी सकाळी 9.30 च्या सुमारास घडली असून सदर अपघाताची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.
घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम आप्पा डिसले (रा. कराड) हा जागीच ठार झाला आहे. तर ओमकार चंद्रकांत पाटील (वय- 15) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. शुभम डिसले व ओमकार पाटील हे दुचाकी वरून कराडहून पाटणच्या दिशेने जात होते.

विहे गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळ कराड- पाटण राज्यमार्गावरील संरक्षक कठडयाला दुचाकी धडकल्याने शुभम डिसले हा युवक जागीच ठार झाला. तर ओमकार पाटील हा जखमी झाला आहे. मृतदेहावर पाटण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंकुशे करीत आहेत.

No comments:

Post a Comment