कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या धनश्री सुरवसे, कल्याणी पवार, कार्तिक डांगे, ज्योती केंदुळे आणि प्रा. विजयसिंह चव्हाण यांचे शोधनिबंध आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या सीआरसी प्रेस टेलर अँड फ्रान्सिस यु. के. (युरोप) मध्ये प्रकाशित झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात नेहमीच विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात
याशिवाय आंतरराष्ट्रीय शोधनिबंध परिषद आयोजित करण्यात आल्या आहेत. या शोधनिबंध परिषद मधुन नवनवीन संशोधकांना प्रेरणा मिळावी हाच हेतु पंढरपूर सिंहगड महाविद्यालयाने डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक वर्षी शोधनिबंध परिषदेचे आयोजन करण्यात येते. महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागामध्ये मशिन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इमेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डीप लर्निंग इत्यादी क्षेत्रात समाजोपयोगी संशोधन सुरू आहे. या संशोधनातून महाविद्यालयातील ५ विद्यार्थी व प्राध्यापक यांनी एकत्र येऊन आपले संशोधन शोधनिबंधातुन प्रकाशित केले आहेत. युरोप मध्ये शोधनिबंध प्रकाशित झाल्याने धनश्री सुरवसे, कल्याणी पवार, कार्तिक डांगे, ज्योती केंदुळे आणि प्रा. विजयसिंह चव्हाण यांचे सर्वञ अभिनंदन व कौतुक होत आहे.
सादर केलेले शोधनिबंध लिहिण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्यासह काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. नामदेव सावंत, डॉ. अल्ताफ मुलाणी, प्रा. सुधा सुरवसे, प्रा. प्रकाश गडेकर, प्रा. सुभाष पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.


No comments:
Post a Comment