आज रविवार दि.26/9/21-- रंगकर्मी, कोल्हापूर तसेच रंगकर्मी महाराष्ट्र तर्फे गेले दीड महिना सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री मा.उद्धवसाहेब ठाकरे यांनी शनिवार दि.25/9/21रोजी टास्कफोर्स व चित्रपट व नाट्य कलाकारांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून 22 ऑक्टोबर 2021 पासून नाट्यगृहे व चित्रपटगृहे सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.या निर्णयामुळे बुधवार दि.29/9/2021चे मुंबई येथील मंत्रालय आणि सह्याद्री अतिथी गृहासमोरील रंगकर्मी, कोल्हापूर तर्फे भरविण्यात येणारा कलाबाजार स्थगित केला आहे.पण सरकारी आदेश( जी.आर.)निघावा आणि नावरात्रौस्तवामध्ये स्थानिक कलाकारांना खुल्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी द्यावी म्हणून हे आंदोलन सुरुच रहाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या सोमवार दि.27/9/2021 रोजी सकाळी ठीक7:30 वा.केशवराव भोसले नाट्यगृहासमोर प्रतिकात्मक "पितृस्मृती "आंदोलन करणार आहोत असे रंगकर्मी कोल्हापूर चे प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, मुकुंद सुतार, सुनील घोरपडे, धनंजय पाटील, मनोज जोशी यांनी सांगितले यावेळी समीर भोरे, मकरंद लिंगनूरकर, दत्ता मोरे, अनिल कटकोळ,झंकार सुतार, सुनील मुसळे इ.उपस्थित होते.
Thursday, 30 September 2021
Home
/
कोल्हापूर
/
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - रंगकर्मी कोल्हापूर तसेच रंगकर्मी महाराष्ट्र यांच्या आंदोलनाला यश.
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - रंगकर्मी कोल्हापूर तसेच रंगकर्मी महाराष्ट्र यांच्या आंदोलनाला यश.
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment