Breaking

Monday, 23 August 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान.


*लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान*
*श्रीपूर*
सोलापूर जिल्हा आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज कार्यकर्त्यांचा स्वाभिमान आमचे प्रेरणास्थान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सरचिटणीस लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने आंबेडकरी चळवळीत व मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनात माळशिरस तालुक्यात आंदोलनात सहभागी झालेल्या ज्येष्ठ कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार बी टी शिवशरण यांनी दिली आहे  राजाभाऊ सरवदे साहेब यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे या दिवशी आंबेडकरी चळवळीचा इतिहास वाटचाल व सध्य स्थिती यांवर ज्येष्ठ कार्यकर्ते यांचे मनोगत जाणून घेतलं जाणार आहे श्रीपूर   परिसरातील विशेषतः पूर्व भागातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय येथे संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment