करमाळा सोलापूर
महावितरणने शेतीपंपाची वीज कपात केल्यामुळे भव्य रस्ता रोको जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल भाऊ खुपसे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली असल्याची माहिती आयोजकाकडुन सांगण्यात आले आहे.
करमाळा टेंभुर्णी रोडवरील कुंभेजफाटा येथे दिं.२४ रोजी ११ वाजता रस्ता रोको आहे.
कोरोना महामारीत शेतकरी सामान्य नागरिक हतबल झाले आहेत पाऊस हवा असा पडला नाही पिके जळायला लागली आहेत शेतकरी कर्जबाजारी झाला आहे अशा अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे त्यात कमीला भर शेतीपंपाची वीज कपात केली आहे ती सुरळीतपणे करावी गेल्या दोन महिन्यापूर्वीच शेतकऱ्यांनी बिले भरली आहेत अधिवेशन सुरू होण्याच्या आगोदर ऊर्जामंत्री विज कपातीचे आदेश देतात आणी अधिवेशन सुरू झाले की उपमुख्यमंत्री आदेश स्थगीत करतात नंतर आदिवेशनाच्या शेवटी ऊर्जामंत्री परत शेतकऱ्यांची विज कपात करण्याचे आदेश देतात म्हणजे शेतकऱ्यांना यांनी काय समजल आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक वेळेस विज कपात केली जात आहे यातूनही शेतकऱ्यांनी विज बिल भरली आसून जर परत दोन महिन्यात विज कपात केली जात आसेल तर शेतकरी महाविकास आघाडी सरकारला जागा दाखवून देतील तसेच एका बाजूने कोरोना सारखा रोग् सर्वसामान्य माणसाच्या पाठीमागे आहे सरकार लाॅकडाऊन करते पाच तालुके लाॅकडाऊन आहेत आशे वेळेस विज कपात होत आसेल तर शेतकऱ्यांनी कसे जगायचे जर मंगलवार पर्यत विज सुरळीत झाली नाहीतर तुम्हाला शेतकर्यांच्या ऊदरेकाला सामोरे जावे लागेल हजारो शेतकरी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत तरी मंगलवार दि 24/8/21 रोजी सकाळी 11 वाजता करमाळा - टेभूर्णी रोडवर कुंभेजफाटा येथे रस्ता रोको करण्यात येणार आहे असे शेतकरी आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment