मोहोळ शहर प्रतिनिधी/ सुनिल गायकवाड - दि. 29/8/2021 ची सोलापूर महापालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती- सोलापूर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी शहरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत.
सध्याची सोलापूर शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाला यश आले आहे, यामुळे महापालिका प्रशासनाने सध्या शहरावरती लक्ष केंद्रित केले असून ,
सोलापूर महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी हे सोलापूर शहरावरती लक्ष देऊन आहेत. महापालिका वैद्यकीय अधिकारी यांनी सोलापूर शहरातील सर्व आरोग्य केंद्रांना सर्व प्रकारचे मदत पुरविली आहे. तरीपण शहरातील काही भागात अजून रूग्ण सापडत आहेत, त्याला कारणही तसेच आहे, लोक विनाकारण बाहेर पडत आहेत, सोशल डिस्टंस पाळत नाहीत, गर्दीच्या ठिकाणी जातात, मास्क व सॅनिटायझर चा वापर करत नाहीत, त्यामुळे शहरात कोरोना वाढत आहे.
सोलापूर शहरातील लोकांना महापालिका वैद्यकीय अधिकारी हे वारंवार सूचना करत आहे की सोशल डिस्टंस ठेवून वागावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्क व सॅनिटायझर वाटप चा वापर करावा, लोकांनी जर ह्या सूचना पाळल्या तर शहरातील कोरोना परिस्थिती लवकरच आटोक्यात येईल.
महापालिकेच्या वतीने शहरातील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. सोलापूर शहरात ठिकठिकाणी लसीकरण कॅम्पचे आयोजन केले जात आहे. तसेच सोलापूर शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आज दि.29/8/2021 ची सोलापूर शहरातील महापालिका क्षेत्रातील कोविड-19 ची माहिती सोलापूर महापालिका वैद्यकीय अधिकारी यांनी सादर केली आहे यामध्ये घरात अलगीकरण, संस्थात्मक अलगीकरण, आयसोलेशन रूग्णांची माहिती, आज प्राप्त झालेले अहवाल, सोलापूर शहरातील पाॅझीटीह्व रूग्णांची माहिती, सोलापूर शहरातील मयत रूग्णांची माहिती, सोलापूर शहरातील कोविड-19 माहिती, अशी एकूण आजच्या दिवसभरातील माहिती सोलापूर महापालिका वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे ती पुढील प्रमाणे......


No comments:
Post a Comment