Breaking

Friday, 16 July 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे- खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची कुर्डूवाडी येथे मिटींग संपन्न.


आज दिनांक 16 / 7 / 2021 रोजी मा खासदार  रंणजितसिंह निंबाळकर साहेब हे कुर्डूवाडी येथे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या समजावून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी यांची कुर्डूवाडी पंचायत समिती मध्ये मिंटीग आयोजित केली होती .
    कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या वतीने मा खासदार रंणजितसिंह निंबाळकर साहेबांचा  सत्कार अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी  केला  तसेच मा रिपाई  जिल्हाचे नेते  चंद्रकांत वाघमारे साहेब यांनी  मा रंणजितसिंह निंबाळकर साहेबांचा गुच्छ देऊन  सत्कार केला .
  त्या वेळी कुर्डूवाडी रेल्वे कारखाना 
   चिंकहिल आर पी एफ ट्रेनिंग सेंटर या दोन्ही विषयावर चर्चा करण्यात आली 
   सध्या कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या विषय हा माढा मतदारसंघातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा प्रश्न आहे .
  माढा मतदारसंघातील नागरिकांनी या विषयावर गल्ली ते दिल्ली पर्यत कुर्डूवाडी रेल्वे कारखान्यासाठी आंदोलन केलेली आहे .त्याच्या बदल्यात कुर्डूवाडी तील दोन  व्यापारी मा अगरचंद धोका व कै पद्माकर काशिद यांच्या वर रेल्वे प्रशासनाकडून गुन्हे दाखल झालेले होते म्हणूनच हा प्रश्न एक ऐतिहासिक प्रश्न म्हणून याची नोंद आहे .
  माढा मतदारसंघातील नागरिकांच्या वतीने मा खासदार रंणजितसिंह निंबाळकर साहेब यांना अध्यक्ष महेंद्र जगताप यांनी कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या  प्रशासकीय इमारत व नवीन शेड चे उदघाटन मा रेल्वे मंत्री यांच्या हस्ते  झाले पाहिजे अशी मागणी करण्यात आली त्या वेळी मा खासदार रंणजितसिंह निंबाळकर साहेब यांनी असे सांगितले की कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या उदघाटना साठी मा रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे साहेब यांच्या हास्ते करणार 
    मी फोन करून वेळ घेतो आणि आपणांस कळवतो असे शिष्टमंडळास सांगितले 
  कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याच्या शिष्टमंडळास  आँगस्ट महिन्याच्या पावसाळी आधिवेशना साठी दिल्लीला मा रेल्वे मंत्री याची वेळ घेण्यासाठी निमंत्रण दिले आहे  दि 3 / 8 / 2021 रोजी कुर्डूवाडी रेल्वे कारखान्याचे शिष्टमंडळ दिल्लीला जाणार  
  या वेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष मा श्रीकांत देशमुख साहेब , मा चंद्रकांत वाघमारे साहेब आर पी आय  आठवले गट सोलापूर जिल्हाचे नेते ,मा रविंद्र ननवरे सर भाजपचे मा गोविंद कुलकर्णी जी भाजपाचे जेष्ट नेते , तालुका अध्यक्ष , मा उमेश पाटील जी भाजप युवा तालुका अध्यक्ष , मा सुधीर भाऊ गाडेकर जी भाजप सोलापूर  जिल्हाचे नेते या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment