Breaking

Tuesday, 6 July 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - जेष्ठ नेते तुकाराम बाबर यांना आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीत स्थान देण्याची मागणी.


*जेष्ठ नेते तुकाराम बाबर यांना आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीत स्थान देण्याची मागणी*



सोलापूर जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तुकाराम बाबर यांची आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र कार्यकारिणीत निवड करावी अशी मागणी माळशिरस तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते यांनी केली आहे लवकरच जेष्ठ कार्यकर्त्यांचे एक शिष्टमंडळ प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांना सोलापूर येथे भेटायला जाणार असल्याची माहिती भरत बनसोडे सतीश लांडगे बापूसाहेब पोळके गौतम आठवले अनिल आठवले अनिल नाईकनवरे कुमार शिंदे प्रभाकर सुरवसे महेश रणपिसे यांनी दिली तुकाराम बाबर यांनी तीस वर्षे दलित चळवळीच्या माध्यमातून अनेक आंदोलनात सहभाग घेतला आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन भुमीहीन लोकांना जमीन रहाण्यासाठी अनेक आंदोलनात त्यांनी मोर्चा सत्याग्रह  केला आहे रामदास आठवले याचे आदेशानुसार आरपीआयचे वतीने अनेक कार्यक्रमात ते सहभागी झाले आहेत त्यांनी सोलापूर जिल्हा आरपीआयचे संघटक म्हणून काम पाहिले आहे राजाभाऊ सरवदे यांच्या विचारांवर माळशिरस तालुक्यात पक्षाचे काम ते करतात.

No comments:

Post a Comment