Breaking

Monday, 26 July 2021

मंगळवेढा तालुका प्रतिनिधी/ अमिर आतार - मंगळवेढा तालुका ग्रामपंचायत कर्मचार्यांचे विविध मागण्यांसाठी उपोषण.


मंगळवेढा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या उपोषणा प्रसंगी न्याय असणाऱ्या मागण्यांची पूर्तता करणे कामी मंगळवेढा तालुक्याचे माजी सभापती मा. प्रदीप खांडेकर मिस्टर सभापती व  हुलजंती गावचे माजी सरपंच मा.सुधाकर मासाळ माननीय गटविकास अधिकारी सुप्रियाताई चव्हाण  ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी मा.साळुंके साहेब ग्रामसेवक संघटनेचे, पदाधिकारी मा. जगताप  भाऊसाहेब .मा. एन बी पाटील भाऊसाहेब व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष जामदार सचिव नवनाथ कांबळे  सहसचिव संजय खडतरे उपाध्यक्ष मसा साखरे तालुका पदाधिकारी अजित लंगडे. महेश काटे यांच्यामध्ये तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अडचणी बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.  उशिरा पर्यंत झालेल्या  प्रदीर्घ वेळेच्या चर्चेनंतर ग्रामसेवक संघटनेचे पदाधिकारी यांनी संबंधित सरपंच.ग्रामसेवक व कर्मचारी यांच्या संयुक्त बैठकीत  आयोजित करून सर्व प्रश्न मार्गी लावण्यात  येईल  यासंदर्भात लेखी उत्तर मिळाले नंतर सदरचे उपोषण  स्थगित करण्यात आले वेळेत न्याय न मिळाल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचे तालुका अध्यक्ष जामदार यांनी सांगितले संघटनेच्या वतीने  सचिव नवनाथ कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment