अपघात प्रकरणी मोटरसायकलस्वार शिक्षकाचा अटक पूर्व जामीन अर्ज नामंजूर- याबाबत अधिक माहिती अशी की भरधाव वेगाने मोटरसायकल चालवून अपघात करून जबर जखमी करून कोणतीही मदत न करता पळुन गेलेल्या शिक्षकाचा बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब श्री ए.बी भस्मे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. याबाबत हकीगत अशी की कुर्डूवाडी परांडा रोड वर नियमित फिरण्यासाठी जाणारे आनंद शिवमूर्ती रजपुत वय 66 यांना आकुलगाव वरून कुर्डूवाडी कडे भरधाव वेगात येणाऱ्या विना नंबर प्लेट लाल रंगाची टी व्ही एस स्टार सिटी मोटरसायकल ने दि. 08_05_2021 दिवशी सायंकाळी 6.30 वाजता पाठीमागून धडक दिली होती.यात आनंद रजपुत यांचे डोक्यास जबर मार लागला होता. त्यावेळी मोटरसायकल चालक शिक्षक बाळासाहेब तुळशीराम खुणे याने यावेळेस कोणतीही मदत न करता मोटरसायकल वरून पुढे निघून गेले. त्यानंतर आनंद रजपूत यांचा मुलगा आशिष रजपुत यांनी त्यांना अपूर्व हॉस्पिटल कुर्डूवाडी व नंतर भगवंत मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी येथे उपचारासाठी दाखल केले होते. दि 09_05_2021 रोजी आनंद रजपुत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याबाबत फरार मोटरसायकलस्वार शिक्षक खुणे यांचे विरुद्ध दि 17_05_2021 रोजी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली होती. त्या नंतर खुणे याने जिल्हा सत्र न्यायालय बार्शी येथे अटक पूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर अर्जाच्या सुनावणी वेळेस फिर्यादी ने व साक्षीदाराने शपथ पत्र दाखल केले तसेच खुणे यांनी अपघातातील मोटारसायकल तपास कामी कुर्डूवाडी पोलिसांना जमा न करता खाडाखोड केलेली वाहन खरेदी पावती तसेच गाडीच्या वर्णनात व रंगा मध्ये तफावत असणारी गाडी पोलीस स्टेशन च्या तपास कामी जमा केली.ही बाब प्रथम दर्शनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे सदरचे मोटारस्वार खुणे यांचे वागणे हे संशयास्पद असलेले निष्कर्ष नोंदवून सदर गुन्हाच्ये सत्यते करता कस्टडीची आवश्यकता असल्याचे मत नमुद करून फरार शिक्षक खुणे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. यात सरकार पक्षातर्फे अॅड प्रदिप बोचरे,तर मुळ फिर्यादी तर्फे अॅड हरिशचंद्र कांबळे, अॅड शंकर ननवरे यांनी काम पाहिले.
Friday, 2 July 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)


No comments:
Post a Comment