Breaking

Sunday, 18 July 2021

पंढरपूर तालुका प्रतिनिधी/ प्रसाद दप्तरदार - पंढरपूरातील अपडेट्स.


पंढरपूरातील अपडेट्स 
काल सायंकाळी पंढरपूर परिसरात मुसळधार पाऊसाला सुरूवात झाली, या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले, साधारणपणे सहाच्या सुमारास चालू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत चालू होता,

सुरवातीला तर या पावसात सुमारे एक दोन फुटावरील देखील दिसत नव्हते.

आषाढी एकादशी च्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून जवळजवळ 3 हजार च्या आसपास पोलीस पंढरपूर येथे दाखल झाले आहेत. सर्व पोलिसांची कोरोना टेस्ट केलेली असून पैकी 4 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले त्यांना विलीगिकरण केलेले आहे.

एकादशी ला महापूजे ला मुख्यमंत्री यांना निमंत्रण देणे साठी गेलेल्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री महोदयांनी होकार दिल्यामुळे पंढरपूर येथील सर्व शासकीय कार्यालयात लगबग सुरू झाली आहे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम यात आघाडीवर आहेत, शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी सुरू झाली आहे.

No comments:

Post a Comment