आपल्या सर्वांचे पाठबळ आणि प्रोत्साहनाच्या बळावर काल मुंबईत मस्जिद बंदर परिसरातील भारत चेंबरमध्ये डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या संपर्क कार्यालयाचे उद्घघाटन उत्साहात पार पडले.
आपल्या डॅशिंग आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीने मुंबई पोलीस, सीबीआयसह महाराष्ट्रात विविध पदांवर काम करुन आपली कारकीर्द गाजविलेले निवृत्त आयपीएस अधिकारी के. एल.प्रसाद यांच्या शुभ हस्ते तसेच कोरोना संकटकाळात 'देवदूत" बनून मुंबईकरांच्या मदतीला धावलेले सुरेश काकाणी (सह आयुक्त, मुंबई महापालिका) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.उपमुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अविनाश सोलवट, बार्शीच्या मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषकाका ठोंबरे,निवृत सनदी अधिकारी दिनकर जगदाळे, विजू माने (सिने दिग्दर्शक),अभिनेते अभिजित चव्हाण, "बाजीराव मस्तानी"फेम अंगद म्हसकर यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाची उंची वाढविली.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तुळशीदास भोईटे, सचिव नंदकुमार सुतार, राष्ट्रीय समन्वयक राजू वाघमारे, सहसचिव केतन महामुनी,सिने-नाट्य निर्माते व संघटनेचे कार्यकारिणी सदस्य दिपक नलावडे, संतोष सूर्यवंशी, सविता कुलकर्णी, मुंबई अध्यक्ष संजय भैरे,,ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल वाघुले, पुणे शहर अध्यक्ष शामल खैरनार,सचिव महेश कुगावकर , पिंपरी-चिंचवडचे नियोजित अध्यक्ष अजिंक्य स्वामी,सोशल मिडिया सहसमन्वयक सचिन डाकले या पदाथिकारी आणि कुंदन हुलवाले,प्रमोद काकडे आणि टीमच्या परिश्रमाने छोटेखानी हा सोहळा यादगार ठरला.
*राज्यातील शेकडो न्यूज पोर्टल्स , यूट्यूब चॅनल्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर हा कार्यक्रम प्रसारित झाला.श सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद*
आपला मित्र,
*-राजा माने,*
संस्थापक अध्यक्ष,


No comments:
Post a Comment