Breaking

Tuesday, 13 July 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते - सातारा, कराड,फलटण,वाई या शहरात आता आॅन द स्पाॅट लसीकरण नाही.


: सातारा जिल्ह्यातील सातारा, कराड, फलटण व वाई या फक्त शहरी भागातील कोविड-19 लसीकरण सत्र यापुढे 100 टक्के ऑनलाइन नोंदणीनुसारच घेण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे या शहरी भागातील लाभार्थींना 'ऑन द स्पॉट' पद्धतीने लसीकरण करण्यात येणार नाही, असे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सातारा जिह्यात कोविड-19च्या अनुषंगाने दि. 10 अखेर पहिला डोस 7 लाख 73 हजार 768 लोकांनी लसीकरणाचा पहिला, तर 2 लाख 8 हजार 505 एकढय़ा लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. याप्रमाणे एकूण 9 लाख 82 हजार 273 एकढय़ा लाभार्थ्यांनी कोविड-19 लसीकरण डोस घेतला आहे. जिह्यातील संपूर्ण पात्र लाभार्थ्यांना नियोजनबद्ध लसीकरण करण्यासाठी जिल्हास्तराकरून योग्य नियोजन करण्यात येत आहे.
 यामध्ये लस उपलब्धतेनुसार दररोज दुपारी 12 काजता लसीकरणसत्र https:// selfregistration.cowin.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

मंगळवारी (दि. 13)पासून लस उपलब्धतेनुसार सातारा, कराड, फलटण व वाई या शहरी भागातील लाभार्थ्यांनी वरील संकेतस्थळावर जाऊन आपली नोंदणी करूनच लसीकरण करायचे आहे. या तालुक्यातील ग्रामीण भागातील लसीकरण सत्र 'ऑन द स्पॉट' पद्धतीनेच सुरू राहील, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

No comments:

Post a Comment