Breaking

Sunday, 11 July 2021

अकलूज-श्रीपूर प्रतिनिधी/ बाळासाहेब ओहोळ - श्रीपूर येथील स्मशानभूमीत अस्वच्छता, साफसफाई करण्याची मागणी.


*श्रीपूर येथील स्मशानभूमी अस्वच्छता साफसफाई करण्याची मागणी*

*श्रीपूर वार्ता*

*श्रीपूर येथील स्मशानभूमीत सर्वत्र अस्वच्छता निर्माण झाली आहे  अंत्यसंस्कार केल्यानंतर काही नागरिकांनी तिरडी चे बांबू सुतळी सुप फळे प्लास्टिक डबे कडबा ताटे तसेच अर्धवट जळालेली लाकडे तेथेच अस्ताव्यस्त पसरलेले आहेत  इथे स्वच्छता होत नसल्याने संपूर्ण स्मशानभूमीत अस्वच्छता आहे  स्मशानभूमी कडे जाणारे रस्त्यावर दोन्ही बाजूला या परिसरात रहाणारे नागरिक रात्री पहाटे प्रातर्विधी करत असल्याने दुर्गंधी पसरली आहे नाईलाजाने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना त्या रस्त्यावरून जावे लागते  स्मशानभूमीत दिवाबत्ती ची सोय नाही  महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीने स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे पंधरा दिवसांनी तरी स्मशानभूमीत स्वच्छता केली पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे  नीरा उजवा कालवा पाट असल्याने स्मशानभूमी कडे जाण्यासाठी महाळुंग ग्रामपंचायत ने लहान पूल तयार केला आहे  पुलासाठी वापरलेले स्टील चे लोखंडी रॉड रस्त्यावर उघडें आहेत रात्री अंत्यसंस्कार करण्यासाठी जाणारे नागरिकांना या लोखंडी रॉड चालताना दुखापत होऊ शकते कारण या मार्गावर लाईटची सोय नाही एकंदरीत स्मशानभूमीत सर्व पातळीवर गैरसोय अडचणी आहेत  नागरिक ही फक्त अंत्यसंस्कार अस्थी विसर्जन या वेळी आल्यावरच स्मशानभूमीत दुरावस्था बाबत चर्चा करतात आपसांत प्रशासकीय यंत्रणे विरोधात तोंडीं ओरड करतात त्या नंतर पुन्हा घरी आले की प्रत्येक जन विसरून जातो  स्थानिक लोक प्रतिनिधी यांनी तर या भागातील नागरी सुविधा विकास कामे याकडे पहिल्या पासून दुर्लक्ष केले आहे निवडणुक आल्यावरच लोक प्रतिनिधी जागं होतात अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे लोक प्रतिनिधी ही गेंड्याची कातडी पांघरलेले आहेत कोणी काही बोला वर्तमानपत्रात बातमी येऊ द्या यांना काही फरक पडत नाही अशी वस्तुस्थिती आहे  एरवी सार्वजनिक कार्यक्रमात मानपान सत्कार करून घेण्यात यांना कमीपणा वाटत नाही शरम येत नाही  लोकं ही मुर्दाड झाले आहेत  निवडणूक आली की पुन्हा अशा बेजबाबदार निष्क्रिय उमेदवारांना  मतदान करतात  त्यामुळे असे निवडून आलेले लोकप्रतिनिधी बेफिकीर व जनतेचे देणं घेणं नाही अशा आविर्भावात वागत असतात.

No comments:

Post a Comment