Breaking

Thursday, 1 July 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे - भाजप कार्यालयात गिरी, वाघ,सोळंखे, रोकडे,घोडके यांचा सत्कार.


भाजप कार्यालयात गिरी, वाघ, सोळंके, रोकडे, घोडके सत्कारीत

माजलगाव/प्रतिनिधी
    सेवानिवृत्त मुख्याध्यापक व चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पुरस्कारीत आणि गोसावी समाजाच्या जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल रामेशराव आडसकर यांनी माजलगाव येथे भारतीय जनता पार्टी च्या कार्यालयात सन्मानित गिरी, सोळंके, रोकडे, घोडके यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
    सावरगाव जि. प.शाळेचे मुख्याध्यापक अर्जुनराव वाघ, ज्ञानेश्वर विद्यालयाचे चे मुख्याध्यापक, श्री सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक, यांची सेवानिवृत्ती झाल्याबद्दल व माजलगाव तालुक्यातील पत्रकार तथा गोसावी समाजातील निर्भीड व्यक्तिमत्त्व भास्कर गिरी यांची शिववंशीय दसनाम गोसावी समाज संस्था महाराष्ट्र संघटनेच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने कै. डॉ. रोहिदास वाघमारे स्मृती गौरव पुरस्कार राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष नानासाहेब घोडके यांना प्रदान करण्यात आला या निमित्त भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आंबा सह. साखर कारखान्याचे चेअरमन रामेशराव आडसकर यांनी भाजप च्या वतीने भाजप कार्यालयात सत्कार केला. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत, बबनराव सोळंके, डॉ. अशोकराव तिडके,  सत्यनारायण उनवणे, ऍड. सुरेश दळवे, ईश्वर खुरपे, अनंतराव शेंडगे, अजय शिंदे, बाळासाहेब क्षिरसागर, छबनराव घाडगे, सुभाष कांबळे, बाळासाहेब बदाडे, संतोष जाधव, राजेश जाधव, नामदेव मुळे, सुनील राठोड, भाऊसाहेब चव्हाण, जायकोबा राठोड, संजय चव्हाण, नवनाथ राठोड, दत्ता महाजन, संजय पवार, भिमाशंकर गिरी यांनी सत्कारितांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment