Breaking

Friday, 9 July 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाख मदत करावी व वडीलांना सरकारी नोकरीत रूजू करावे अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा अतुल खुपसे-पाटील यांचा इशारा.


 *स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांना सरकारने 50 लाख मदत करावी व वडीलांना सरकारी नोकरीत रुजू करावे*
---- *जनशक्ती संघटनेचे प्रदेशअध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांची मागणी* 
 अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा
----------------------------------------
 
---------------------------------------
एमपीएससी परीक्षेत पास झालेला विध्यार्थी स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली आणि सर्व महाराष्ट्र हळहळला घरची परिस्थिती अगदी गरीबाची असताना सुद्धा स्वप्निल लोणकरला  एमपीएससी परीक्षेत पास होऊन देशाची राज्याची सेवा करण्याची होती देश्याची सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या  स्वप्निल डोंगरे याने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नाईलाजास्तव आत्महत्या केली आठ दिवसापूर्वी स्वप्निल लोणकर ने आपले जीवन संपवले एमपीसी पास होऊनही आपल्याला नियुक्ती दिली जात नाही आणि घरावर झालेला कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी आपण आई-वडील यांना मदत करू शकत नाही यामुळे स्वप्नील या विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन संपवत बाकीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी चिठ्ठी लिहून ठेवली.परंतु दुर्दैव म्हणाव लागेल की स्वप्नील लोणकरच्या आत्महत्या नंतरही महाआघाडीतील व राज्यतील आमदार खासदार मंत्री संत्री यांनी त्याच्या परिवाराला साधी भेट सुद्धा दिली नाही मात्र महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी गोरगरीब लोकांनसाठी विध्यार्थीच्या प्रश्न जाणून घेण्यासाठी अन्याय अत्याचारला वाचा फोडण्यासाठी फिरनारे शेतकरीपुत्र जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे पाटील स्वप्नील यांच्या यांना  केडगाव चौफुला येथील राहत्या घरी जाऊन भेट दिली व स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबाचे यावेळी सात्वन केले. यावेळी स्वप्नीलच्या  वडिलाला आपले अश्रू आवरता आले नाही त्याने लहानपणापासून केलेली सामाजिक कार्य आणि त्याचे सर्व अपेक्षाचा पाडा स्वप्नील लोणकरच्या वडिलांनी ढसा ढसा अश्रू गाळात वाचून दाखवला स्वप्निलने 28 वेळा प्लाजमा दान केले होता अनेक वेळा रक्तदानही केले पोलीस मित्र म्हणून पोलिसांची पोलिसांना पण मदत करण्याचे काम त्यांनी केले जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्नतो पाहत होता परंतु सरकारच्या नकर्तेपणामुळे मानसिक तानामुळे त्याने आत्महत्या केली स्वतःला संपवून घेतले आणि नंतर शासनाला जाग आली याप्रसंगी अतुल खूपसे यांनी गोपीचंद पडळकर यांना फोनवरून संपर्क साधला आणि स्वप्निलच्या वडलाच आणि गोपीचंद पडळकर यांचं बोलन करून दिलं आत्तापर्यंत त्यांच्याकडे त्याच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी प्रशासनाचा आणि सरकारमधील अधिकारी किंवा मंत्री भेटायला सुद्धा आला नाही याची खंत स्वप्नील च्या वडिलांनी बोलून दाखवली.या प्रसंगी जनशक्ती चे अतुल खूपसे म्हणाले की स्वप्नील लोणकर यांची ही आत्महत्या नसून मुर्दाड व्यवस्था व महाविकास आघाडी सरकारने केलेली हत्या आहे दरम्यान सरकारला 31जुलै पर्यंत एमपीएससी पास झालेल्या 413 विद्यार्थ्यांची नियुक्ती दिली नाही तर जनशक्ती  संघटनेच्या माध्यमातून मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा ही दिला आहे. यावेळी उपस्थित गणेश ढोबळे राहुल वाघे कल्याण गवळी  व इतर जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment