Breaking

Friday, 25 June 2021

संपादक/ दूध दर प्रश्नी आज मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय झाला...रयतक्रांतीचे प्रा. सुहास पाटील.


दूध दरात तातडीने वाढ आणि दुधाला एफ. आर. पी. चा (हमीभाव) कायदा करणार ! दुग्ध विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिले आश्वासन.दूध दर प्रश्नी आज मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय झाला. रयत क्रांतीचे प्रा सुहास पाटील..
राज्यात दूध प्रश्नावर रयत क्रांती संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर दुग्धविकास मंत्रालयाने याची नोंद घेत त्यावर तोडगा काढण्यासाठी दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.  
शेतकरी प्रतिनिधी, दूध संघ व खाजगी दूध कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यात विविध चर्चा  झाली. दुधाचे दर तातडीने वाढविले जाणार असल्याने व दुधाला एफ. आर. पी. चा कायदा (हमीभाव) करण्याचे धोरण घेतले जाणार असल्याचे मंत्री सुनिल केदार यांनी आश्वासन दिले.विद्यापीठ संशोधन शिफारशीनुसार दुधाचा ऊत्पादन खर्च व १५% नफा हे ग्रहीत धरून २७ ते ३६ रूपये दर निघतो.यानुसार एफ. आर,पी.चा कायदा करून लवकरात लवकर दुध ऊत्पादक शेतकर्‍यांच्या दुधाला हमीभाव देण्याची घोषणा मंत्री सुनिल केदार यांनी केली.या बैठकीमध्ये पशुधन लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्याचे ठरले.पशु औषधांचा स्टाॅक जाहीर करून शेतकर्‍यांना औषधांची ऊपलब्धतता सांगणे.पशु वैद्यकीय अधिकार्‍यांच्या नेमणुका त्वरीत करणे.गीर गाई,थारपारकर,देवणी,राठी,खीलार या जातींच्या गाईंचे संगोपण वाढवण्याकडे अधिक लक्ष देण्याचे सरकारने घोषित केले.दुध संकलन केंद्रावर दुध पावत्यांवर दुध संघाचे नाव नमुद करणे.दुध तपासणी मशीन योग्यता तपासणे.यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करणे.
यावेळी संपन्न झालेल्या बैठकीत दूग्ध विकास मंत्री सुनील केदार, माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे,माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, किसान सभेचे डॉ. अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवनाथ जाधव, रयतचे कार्याध्यक्ष दिपक भोसले, रयतचे प्रवक्ते प्रा सुहास पाटील, रयतचे प्रवक्ते भानुदास शिंदे, युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, उमेश देशमुख, आ. डॉ. किरण लहमटे, शेतकरी प्रतिनिधी धनंजय धोरडे, विठ्ठल पवार, दूध संघाचे प्रतिनिधी रणजित देशमुख, प्रकाश कुतवळ,दशरथ माने, गोपाळराव म्हस्के विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment