Breaking

Monday, 21 June 2021

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी/ सतिश निंबाळकर - उजनी धरणातील पाणी कसे वाचवले त्या आंदोलनाची सुरूवात ते शेवट सविस्तर वाचा.


उजणी धरणातील पाणी कस वाचवले त्या आंदोलनाची सुरूवात ते शेवट सर्व सविस्तर 

उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या कामगिरीमुळे जिल्ह्याचे पाणी वाचले 




22 एप्रिल रोजी उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूर येथील प्रकल्पाला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविल्याचे बातमी वाचनात येताच सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुहास घोडके यांनी याबाबत सोशल मिडीयावर "उजनी बचाव" बद्दल पोस्ट करुन वाचा आणि षंढासारखं थंड बसा अशा शब्दात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागे केले. सुहास घोडके यांच्या फेसबुकवरील पोस्ट पाहुन सोलापूर जिल्ह्यावर हा अन्याय झाल्याचे लक्षात येताच लगेचच दुपारी २ वाजता शेतकरी नेते अतुल खूपसे-पाटील यांनी उजनी जलाशयामध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून तो पुतळा उजनी जलाशयात बुडवून आंदोलन केले. विशेष म्हणजे कोरोना सारख्या गंभीर आजारातुन अतुलभाऊ बरे होवुन अवघे ४-५ दिवस झाले होते. तरीही त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तब्बेतीची पर्वा न करता त्यांनी जिल्ह्यातील आंदोलनाची पहिली ठिणगी पेटवली आणि त्यांच्यावर उजनीच्या पाण्यासाठी पहिला गुन्हा दाखल झाला.

मात्र एका आंदोलबावर थांबणारा हा विषय नाही, पाणी पळविण्यासाठी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बारामतीकरांनी मोठे षडयंत्र रचले आहे हे अतुल भाऊ यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पंढरपूर तालुक्यातील चळवळीचे शेतकरी नेते माऊली भाऊ हळणवर यांच्याशी संपर्क करून  याबाबत  मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे सांगितले. आणि या दोघांनी विचारविनिमय करुन उजनीचे  पळविलेले पाच टीएमसी पाणी वाचविण्यासाठी मोठी चळवळ उभा केली. दिनांक  26  एप्रिल रोजी कुर्डू येथे जिल्ह्यातील सर्व संघटनांच्या शेतकरी नेत्यांची बैठक आयोजित केली व सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी जलाशयावर बारामतीकरांनी कशाप्रकारे अन्याय केलाय सांडपाणी हा शब्द वापरून इंदापूरकर यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बारामतीकरांनी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी किती अट्टाहास केलाय हे सर्व शेतकरी नेत्यांना समजावून सांगितले आणि दिनांक 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन करायचे असे ठरले.

बेकायदेशीर जमाव गोळा केल्या प्रकरणी अतुल खूपसे पाटील यांच्या वर दुसरा गुन्हा दाखल झाला.


एकीकडे महाराष्ट्र महाराष्ट्र दिन शासकीय नियमांना अधीन राहून साजरा होत असतानाच दुसरीकडे उजनीतील पाच टीएमसी पाणी पहिलीच्या करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 1 मे रोजी उजनी मध्ये जलसमाधी घेण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता मात्र शेतकऱ्यांना व शेतकरी ने त्यांना कोणत्याही परिस्थितीत उजनी पर्यंत पोहोचू द्यायचं नाही असा इरादा पोलिसांनी ठरविला होता त्यानुसार दिनांक 1 मे रोजीच उजनी जलाशय भूती पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला पुणे विजापूर राष्ट्रीय महामार्ग ते उजनी गाव परिसरात पोलीस मोठ्या संख्येने दाखल झाले त्यामुळे अशा परिस्थितीत उजनीत पोहोचणे कठीण आहे हे लक्षात घेऊन सर्व शेतकरी नेत्यांनी गनिमी कावा पद्धत वापरून पहाटे पाच वाजल्यापासूनच उजनी जलाशय परिसरात दबा धरून बसले होते आंदोलनाच्या टाइमिंग जवळ येताच ऊस पिकात बसलेले शेतकरी उजनी जलाशय आकडे आले आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता उजनी जलाशयात उड्या मारल्या. 

 


उजनी जलाशयातील शेतकरी नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहुन प्रशासनाने ७ मे रोजी पालकमंत्र्यासमवेत बैठक लावली. याबाबतचे लेखी पत्र घेवुनच सर्वजण उजनीबाहेर आले आणि याठिकाणी त्यांच्यावर ३ रा गुन्हा दाखल झाला. 


मात्र या बैठकीत सोलापूरकर मला जमु देणार नाहीत असे समजुन पालकमंत्री भरणे दि. ७ मे रोजी सोलापूर दौऱ्यावर असताना देखील हि बैठक रद्द करुन दि.१० मे रोजी सिंचन भवन, पुणे येथे बैठक आयोजित केली.


दरम्यान, १० मे च्या बैठकीला जाताना पुण्याकडे जाताना शेतकरी नेत्यांना पोलीसांनी प्रचंड त्रास दिला. मात्र या त्रासाला सहन करत शेतकरी नेते पुण्यात सिंचन भवनला पोहचले. सिंचन भवन च्या खालीदेखील पोलीस व सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी नेत्यांमध्ये चकमक झाली फक्त पाच लोकांना बैठकीसाठी बोलावले आणि इतके लोक कसे आले असा फतवा पोलिसांनी काढला मात्र जेवढ्या लोकांनी आंदोलन केले तेवढे लोक बैठकीसाठी आले आहेत बैठक झाली तर सर्वांसमक्ष होईल असे सांगताच पालकमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांचा विचार मान्य करून बैठक सुरू केली.

इकडे या बैठकीत पालकमंत्र्यांनी अगोदरच इंदापूरचे शेतकरी आणुन बसविले होते. त्यामुळे सोलापूर व इंदापूरच्या शेतकऱ्यांची याठिकाणी चकमक झाली. आणि सोलापूर जिल्ह्यातील आंदोलक शेतकरी पालकमंत्र्याच्या या कुटनितीमुळे जाम वैतागले. त्यामुळे आता थांबणे नाही हा निश्चय करुन उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने पुणे सोडले.


दुसऱ्या दिवशी पासुन जिल्ह्यामध्ये उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने अतुलभाऊ व माऊलीभाऊ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये आंदोलनांचा भडका उडाला. टायरे पेटवुन, रास्ता रोको करुन, आमदारांच्या दारात हलग्या वाजवुन या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये या दोघांसह समिती व शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत.


उजनी धरण पाणी बचाव संघर्ष  समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलक व शेतकऱ्यांनी आंदोलनांच्या माध्यमातून रौद्ररूप धारण केले आहे हे लक्षात येता राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिनांक 16 मे रोजी उजनी जलाशयातील पाच टीएमसी पाणी इंदापूरला वळविण्याचे जो निर्णय झाला आहे तो रद्द केला असल्याचे घोषित केले त्यामुळे एकार्थी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या लढ्याला यश आले होते मात्र तोंडी अध्यादेश काढून जवळपास पाच दिवस उलटून गेले आहेत तरीही याबाबत अद्याप कोणताही लेखी अध्यादेश नाही यामुळे दिनांक बावीस मे रोजी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील राजाराम पाटील सहकारी साखर कारखाना च्या निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला.

दरम्यान इकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते सुहास घोडके यांनी उजनीचे पाणी पळविले तर जिल्ह्याचे कसे नुकसान होते, बारामतीकरांनी उजनीचे पाणी पळविले तरी जिल्ह्यातील नेते गप्प का..? जर हा निर्णय कायम राहिला तर राष्ट्रवादीला कसा फटका बसू शकतो, सोलापूर जिल्ह्याला वाळीत टाकून सुप्रिया सुळे यांचा बारामती मतदारसंघ वाचविण्यासाठी बारामती करांनी इतका का अट्टाहास केला आहे. या सारखे अनेक विषयांवर लिखाण करून आवाज उठविला. शिवाय इंदापूर भागात फिरून इंदापूरच्या 22 गावच्या पाण्यासाठी ज्या ज्या लोकांनी संघर्ष केला आहे त्यांच्या आंदोलनाला कधी यश आले, त्यांनी आंदोलनाची कशाप्रकारे ठिणगी पेटविली, त्यांना पाणी मंजूर झाले त्या प्रकल्पाचे पूजन तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते झाले, मात्र अद्यापही त्यांना पाणी मिळाले नाही याला जबाबदार फक्त बारामतीकर आहेत. याचे पुरावे गोळा करुन आपल्या लेखणीच्या माध्यमातून जिल्हावासीयांना पुढे मांडले.


दरम्यान ठरल्याप्रमाणे इस्लामपुर येथील जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या निवासस्थानासमोर उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन दि.२७ मे रोजी  आयोजित केले होते. "जोपर्यंत लेखी आदेश देत नाही तोपर्यंत इस्लामपूर सोडणार नाही" असा पण समितीने केला होता. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासूनच निवासस्थानाच्या परिसरात चार किलोमीटर परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त उभा केला होता. त्यानुसार पोलिसांनी सकाळी नऊ वाजता समितीचे उपाध्यक्ष ॲड.बापूसाहेब मेटकरी, सदस्य धनाजी गडदे, आप्पासाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष कवले या एका टीमला धरपकड करून अटक केली व नजरकैदेत ठेवले.

मात्र दुसरी अतुल खुपसे पाटील, माऊली हळणवर, दिपक भोसले, दिपक वाडदेकर यांच्या टिमने अत्यंत शिताफीने निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन केले. विशेष म्हणजे यावेळी आंदोलकांच्या ३ टिम केल्या होत्या. पहिली टिम सकाळीच पोलीसांच्या हाती लागलीं दुसरी टिम बळाचा वापर करुन निवासस्थानाच्या गेटपर्यंत गेली. मात्र यदा कदाचित प्रमुख शेतकरी नेते असलेल्या दुसर्‍या टीमला दगाफटका झाला आणि त्यांना देखील उचलले तर पोलीस समजतील की आता प्रमुख लोक  व  त्या आधीची एक अशा दोन्ही टीमला पकडले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सुस्त राहील असा विचार करून तिसरी टीम देखील या वेळी कार्यरत होती आणि ही तिसरी टीम  डोंगर-दऱ्या यांचा सामना करून सात किलोमीटर चालत येऊन कारखाना परिसरात दबा धरून बसली होती. 

दरम्यान दुसऱ्या टिमने यशस्वी आंदोलन केले. प्रसंगी आमच्यावर गोळ्या झाडा पण लेखी आदेश दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतला.  आणि या आंदोलनाची धास्ती घेवुन जलसंपदा मंत्री यांनी तात्काळ उजनी जलाशयातील पाणी उचलण्याचा रद्द चा तो लेखी शासकीय अध्यादेश काढला. 



एकुणच उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने पहिल्यादिवसापासुन क्षणाचीही उसंत न घेता सोलापुरकरांसाठी जिवाचे रान करुन, पोलीसांचे गुन्हे अंगावर घेवुन हि खिंड लढवली त्याला मोठे यश आले आहे. 
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाण्याच्या किमान २ पाळ्या आता मिळतील. म्हणजे पाणी पळविले असते तर मिळणाऱ्या रोटेशनमधुन २ पाळ्या कमी झाल्याच असत्या. आता त्या वाचल्या असुन याचे सगळे श्रेय जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांसाठी लेखनी झिजवणार्या पत्रकार बांधवांचे म्हणावे लागेल.

No comments:

Post a Comment