Breaking

Tuesday, 1 June 2021

मोडनिंब प्रतिनिधी/ विनोद नागटिळक - मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने पाणी पुरवठा कर्मचारी प्रदीप व्यवहारे व राष्ट्रवादी युवती अध्यक्ष ॠतुजा सुर्वे यांचा सत्कार.

मोडनिंब प्रतिनिधी / विनोद नागटिळक 

मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने पाणीपुरवठा कर्मचारी प्रदीप व्यवहारे व राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष ऋतुजा सूर्वे यांचा सत्कार 

मोडनिंब ग्रामपंचायतीच्या वतीने आज राजवाडा हॉल येथे ग्रामपंचायत ची मासिक मीटिंग आयोजित केली होती. मासिक मीटिंग चालू करण्यापूर्वी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मा. सौ मीनाताई शिंदे सरपंच,उपसरपंच,सदस्य, सदस्या व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.मोडनिंब ग्रामपंचायतीकडे गेली 23 वर्ष अहोरात्र प्रामाणिकपणे पाणीपुरवठा कडे सेवा करणारे, मोडनिंब ग्रामपंचायतीचे प्रामाणिक व्यक्तिमत्व असलेले कर्मचारी प्रदीप उर्फ पिंटू व्यवहारे यांची दहा टक्के कोट्यातून  जिल्हा परिषद मार्फत मोडनिंब प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचर म्हणून नेमणूक झाली. त्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार मा. सौ. मीनाताई शिंदे सरपंच, मा. श्री. दत्ता बापू सुर्वे उपसरपंच,सदस्य, सदस्या व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना पुढील त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.  तसेच राष्ट्रवादी युवती मोडनिंब शहराध्यक्षपदी कु. ऋतुजा सुर्वे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार मा. सौ. मीनाताई शिंदे सरपंच, व मा.श्री.दत्ता बापू सुर्वे उपसरपंच,सदस्य, सदस्या आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री.काटकर साहेब, सर्व सदस्य, सदस्या, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment