Breaking

Wednesday, 12 May 2021

भोसरे प्रतिनिधी/ अमोल हावळे - महाराष्ट्र शासनाने SC, ST ला पदोन्नतीत आरक्षण देताना अन्याय करू नये.


Sc/ ST ला पदोन्नतीत आरक्षण देत असताना महाराष्ट्र शासन ते बंद करण्याचे कट कारस्थान का करत आहे? भारतीय संविधान कलम 16 (4 क) या अनुच्छेदातील कोणत्याही कारणाने राज्याच्या नियंत्रणाखाली क्षेत्रामध्ये 






ज्या अनुसूचित जाती किंवा जमाती त्या राज्याच्या मते पर्याप्त प्रतिनिधीत्व देण्यात आले नसेल त्यांना त्यांच्या प्रर्याप्त नियंत्रणाखाली सेवा संबधीत कलम 16( 4 क) तील कोणत्याही वर्गा मध्ये किंवा परिणाम सुरूप जेष्ठतेसह 






पदोन्नती आरक्षण करण्यासाठी राज्यांना कोणत्याही तरतुदी करण्यास प्रतिबंध होणार नाही. कलम 335 संघराज्य किंवा राज्य कारभाराच्या संबंधातील सेवे मध्ये पदावर नियुक्ती करताना अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीत या मधील व्यक्तिच्या हक्क मागण्या प्रशासनाची कार्यक्षमता  






राखण्याशी सुसंगत असेल. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीत यामधील व्यक्तिसाठी आवश्यक असलेली गुणमर्यादा शिथिल करणयाच्या दुष्टीने किंवा मूल्यमापनासाठी आवश्यक असलेल्या गुणवत्तेचे प्रमाण कमी करणचे कोणत्याही गोष्टीमुळे प्रतिबंध होणार नाही, 







SC ST पदोन्नती आरक्षण भारतीय संविधान  कलम नुसार देत आसताना महाराष्ट्र शासन  बहुज वंचित समाजावर अन्या करत आहे. .सर्व बहुजन समाजातील लोकांनी शासनाला जाब विचारला पाहिजे अशी मागणी बहुजन समाजातून होत आहे. 

No comments:

Post a Comment