Breaking

Wednesday, 26 May 2021

माढा तालुका प्रतिनिधी /मदन मुंगळे- सोलापूर जिल्हासाठी लसीचा पुरवठा वाढवून देण्यात यावा...रयतक्रांती संघटनेचे प्रा. सुहास पाटील यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे मागणी.


माढा तालुका प्रतिनिधी/ मदन मुंगळे - सोलापूर जिल्ह्यासाठी लसीचा पुरवठा वाढवून देण्यात यावा...रयतक्रांती चे प्रा.सुहास पाटील यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे आणी दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे, तसेच पुणे विभागातील  जिल्ह्यांच्या मृत्यू दरांपैकी सर्वात जास्त मृत्यू दर हा सोलापूर जिल्ह्यात आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यची लोकसंख्या 43.2 लाख असून आतापर्यंत फक्त 4.93 लाख लोकांनाच लस मिळाली आहे. पुणे विभागाच्या जिल्ह्यांच्या टक्के वारी पैकी 11.41% लोकांचे लसीकरण झाले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला लसपुरवठा खूप कमी झालेला आहे. त्यामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्यावर हा सरासर अन्याय असून सध्या दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे व याकडे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की सरकारी मृत्यू दराचे प्रमाण व प्रत्यक्ष कोरोना रूग्ण मृत्यू चे प्रमाण या आकडेवारी मध्ये प्रचंड तफावत आहे. व प्रत्येक ग्रामपंचायतीला स्पष्ट आदेश देऊन ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूंची संख्या व त्याचा सर्वे करण्यात यावा तसेच कोरोना लसीकरण प्रत्येक गावात शिबिर घेऊन करण्यात यावे, कारण ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक, अंध व्यक्ती, शिवाय गोरगरीब कुटूंब यांना लसीकरण केंद्रावर येण्याची व्यवस्था होत नाही. ती व्यवस्था ग्रामपंचायतनी करावी. अशा प्रकारे रयतक्रांती संघटनेचे प्रा सुहास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले आहे.









सोलापूर जिल्ह्यासाठी लसीचा पुरवठा वाढवून देण्यात यावा...रयतक्रांती चे प्रा.सुहास पाटील यांची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी- याबाबत वृत्त असे की सोलापूर जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे आणी दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे, तसेच पुणे विभागातील  जिल्ह्यांच्या मृत्यू दरांपैकी सर्वात जास्त मृत्यू दर हा सोलापूर जिल्ह्यात आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यची लोकसंख्या 43.2 लाख असून आतापर्यंत फक्त 4.93 लाख लोकांनाच लस मिळाली आहे. पुणे विभागाच्या जिल्ह्यांच्या टक्के वारी पैकी 11.41% लोकांचे लसीकरण झाले आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याला लसपुरवठा खूप कमी झालेला आहे. त्यामुळे आमच्या सोलापूर जिल्ह्यावर हा सरासर अन्याय असून सध्या दिवसेंदिवस सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे व याकडे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. तसेच या निवेदनात म्हटले आहे की सरकारी मृत्यू दराचे प्रमाण व प्रत्यक्ष कोरोना रूग्ण मृत्यू चे प्रमाण या आकडेवारी मध्ये प्रचंड तफावत आहे. व प्रत्येक ग्रामपंचायतीला स्पष्ट आदेश देऊन ग्रामीण भागातील कोरोना मृत्यूंची संख्या व त्याचा सर्वे करण्यात यावा तसेच कोरोना लसीकरण प्रत्येक गावात शिबिर घेऊन करण्यात यावे, कारण ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिक, अंध व्यक्ती, शिवाय गोरगरीब कुटूंब यांना लसीकरण केंद्रावर येण्याची व्यवस्था होत नाही. ती व्यवस्था ग्रामपंचायतनी करावी. अशा प्रकारे रयतक्रांती संघटनेचे प्रा सुहास पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन दिले आहे.

No comments:

Post a Comment