Breaking

Tuesday, 11 May 2021

संपादक/ मोडनिंब येथील अपुर्या सुविधांसह असलेले कोविड सेंटर रद्द करण्याबाबत चंद्रकांत आबा गिड्डे यांचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना निवेदन.


संपादक/ मोडनिंब येथील कोविड सेंटर रद्द होणेबाबत चंद्रकांत आबा गिड्डे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन- याबाबत वृत्त असे की मोडनिंब येथे शासनाने चंद्रकांत आबा गिड्डे यांच्या स्वतः च्या मालकीच्या असलेल्या स्वामी समर्थ मंगल कार्यालयात कोविड सेंटर सुरू केले परंतु तेथे असणार्या सुविधांचा अभाव, व आसपास असणारी दाट लोकवस्ती याचा विचार केला नाही, तसेच







पेशंटसाठी शौचालयाची अपुरी सोय असल्याने ते सतत बाहेर पडत असतात, व याचा त्रास कुटूंबाला व शेजारील लोकांना होतो आहे, तसेच माझे कार्यालय हे गेल्या एक वर्षापासून बंद आहे, तसेच उन्हाळ्याचे दिवस असल्याने व 







कार्यालयाला वरून पत्रा असल्याने पेशंट सतत बाहेर पडत असतात, त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून कोविड सेंटर रद्द करावे असे निवेदन चंद्रकांत आबा गिड्डे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांना दिले आहे.

No comments:

Post a Comment