कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी/ रेणूताई पोवार - धक्कादायक! कोल्हापूरातील बालकल्याण संकुलातील 14 मुलींना कोरोनाची लागण- याबाबत वृत्त असे कीकोरोना संदर्भातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आजपर्यंत 18 वर्षाखालील वयोगटातील मुला-मुलींना कोरोनापासून संरक्षित गट मानला जात होता. मात्र कोल्हापुरातील शासकीय बालकल्याण संकुलातील 6 ते 18 वयोगटातील
एकूण चौदा अल्पवयीन मुलींना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या गटातही आता कोरोनाने शिरकाव केल्याने पालकांसह प्रशासनाची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे. सध्या या चौदा मुलींची प्रकृती ठीक असून त्यांना शिवाजी विद्यापीठाच्या कोविड सेंटर मध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
कोल्हापुरातील पाण्याचा खजिना येथील या शासकीय संकुलात एकूण पाच युनिटमध्ये 250 मुलं-मुली आहेत. यापैकी मुलींची संख्या 46 इतकी आहे.
No comments:
Post a Comment