Breaking

Friday, 5 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे-शिवसेनेच्या माजी आमदाराने केली विनामास्क फिरणार्यांवर कारवाई करणार्यांच मारहाण.


शिवसेनेच्या माजी आमदाराने केली विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्यांनाच मारहाण.....
 
औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असून मास्कचा वापर टाळणारे नागरिक, व्यापारी, फळविक्रेत्यांवर औरंगाबाद महानगरपालिकेचे पथक, माजी सैनिक व नागरिक मित्र पथकाकडून कारवाई केली जात आहे. 
पथक कारवाई करत असताना शिवसेनेच्या माजी आमदारासह तिघांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
 याप्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, भा.ज.पा.चे माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी यांच्यासह तिघांवर रात्री ११ नंतर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 
या संदर्भात माजी सैनिक असलेले देवीदास लक्ष्मण सुसर यांनी फिर्याद दिली आहे.
 या प्रकरणात सुरेंद्र माणिकराव कुलकर्णी (रा. उल्कानगरी), आतिश भगवानराव जोजारे (रा. दिवाण देवडी) यांना अटक करून मे.न्यायालयात उभे केले असता ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
तर माजी आमदार किशनचंद तनवाणी हे फरार असल्याचे क्रांती चौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले. 
सुसर यांच्या तक्रारीनुसार ते स्वत:, आबाराव राघव साळुंके, आत्माराम तुकाराम गवळी असे काही जण  सायंकाळी गुलमंडी भागात मास्क न वापरणारे हातगाडीवाले, फळविक्रेते, नागरिकांवर कारवाई करत होते. 
महापालिका आयुक्तांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात येत होती. 
मात्र, शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी, सुरेंद्र कुलकर्णी, आतिष जोजारे हे गुलमंडीवर आले व कारवाईस विरोध करू लागले. 
त्यांनी सुसर यांच्यासोबतच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. 
शासकीय कामात अडथळा आणला, असे तक्रारीत म्हटले आहे. 
या संदर्भात किशनचंद तनवाणी यांना विचारले असता ते म्हणाले, “म.न.पा.चे पथक सर्वसामान्य माणसांवर अरेरावीची भाषा वापरते.

No comments:

Post a Comment