Breaking

Thursday, 4 March 2021

सातारा जिल्हा प्रतिनिधी/ मारूती सोमुत्ते- पेट्रोल परवडत नसल्याने चक्क खांद्यावर घेतली स्कूटी? जाणून घ्या नक्कीच काय घडलं.


 पेट्रोल परवडत नसल्याने थेट खांद्यावर घेतली स्कूटी?; 
जाणून घ्या नक्की काय घडलं......
 
हिमाचाल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये सध्या एका व्हायरल व्हि.डी.ओ.ची प्रचंड चर्चा आहे. 
या व्हि.डी.ओ.मध्ये एक व्यक्ती आपल्या पाठीवर स्कूटी घेऊन एका हायवेवर चालताना दिसत आहे. 
हा व्हि.डी.ओ. मागील काही दिवसांपासून चर्चेत असला तरी त्यामागील खरी माहिती आता समोर आलीय.
 पाठीवर संपूर्ण स्कूटर उचलून चालणाऱ्या व्यक्तीच्या या व्हायरल व्हि.डी.ओ.चा संदर्भ इंधनाच्या वाढत्या दरांशी जोडला जात आहे. 
तर काहींनी या व्यक्तीची स्कूटी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडल्याने त्याने ती पाठीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केलाय. 
मात्र असं काहीही नसल्याची माहिती समोर आली आहे. 
या व्यक्तीने स्कूटी खांद्यावर घेऊन चालण्यामागील खरं कारण समोर आलं आहे. 
कुल्लूमधील गॅमन ब्रिजजवळचा हा व्हि.डी.ओ. व्हायरल झाला आहे. 
या व्हि.डी.ओ.मध्ये स्कूटी आपल्या पाठीवर घेऊन चालणाऱ्या व्यक्तीचे नाव प्रकाश चंद असं असल्याचे दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. 
कुल्लूपासून तीन किलोमीटर दूर असणाऱ्या न्यूली येथे प्रकाश राहतो. 
प्रकाश हा मजुरीचे काम करतो, अशी माहितीही समोर आली आहे. 
असं असतानाच आता प्रकाश कोणाची स्कूटी आणि कशासाठी आपल्या खांद्यावर घेऊन चालत होता असा प्रश्न विचारला जाणं सहाजिक आहे.
 मात्र या व्हायरल व्हि.डी.ओ.मागील खरी माहिती समोर आली आहे.

No comments:

Post a Comment