Breaking

Monday, 29 March 2021

बीड जिल्हा प्रतिनिधी/ सुदाम शिंगाडे- बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली.


बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पार पडली-

यावेळी बीड शहर व मतदारसंघातील विकास कामाबद्दल काही मुद्दे मांडले आहेत.

1)बीड विधानसभा मतदारसंघातील स्वत: ची इमारत नसलेल्या अंगणवाडी बांधकामासाठी जाणीवपुर्वक विलंब करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी.

2)जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत या पदाचा अतिरिक्त पदभार पाहणाऱ्या व्यक्तीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. अशी संपूर्ण रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत.

3)जिल्हा नियोजन समितीला अनुपालन अहवाल व माहिती न सादर करणार्या बीड नगर परिषद मुख्यधिकारी डॉ उत्कर्ष गुट्टे यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी.
   बीड नगर परिषद मुख्यधिकारी हे अत्यंत निरढाळलेले अधिकारी असून त्यांच्या निलंबनाचा ठराव कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवले जाणार आहे.
   बीड शहरातील सण २०१२ पासूनची अनेक विकास कामे रखडली आहेत अमृत भुयारी गटारचे व पाणी पुरवठा योजनेच्या नावाखाली रस्ते खोदून टाकले आहेत. ही कामे तातडीने पूर्ण करून नवीन विकासकांमाची कार्यणीत pwd करण्यात यावी अशी यावेळी आ.क्षीरसागर यांनी विनंती केली.

4)श्री क्षेत्र नारायणगड विकास आराखड्यातील विकास कामांना होत असलेला विलंब, मंत्रालयीन
स्तरावरून निधीवितरणासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन मा. पालकमंत्री महोदयांनी या बाबत विभाग, मंत्री, सचिव यांच्यासोबत लवकरात लवकर बैठक घेण्याचे नियोजन करावे .

5)बीड शहरातील जुनी आयटीआय इमारत धोकादायक होत असल्यामुळे नवीन इमारत जुन्या आयटीआय जागेत बांधण्यात यावी अशी मागणी केली.

6)शहरात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनीच्या वस्तीगृहाला शासनाने मंजुरी दिली आहे. केवळ नगर परिषदेकडून  जागा उपलब्ध होत नसल्याने याबाबत निधी आखर्चित राहिला आहे. नगर परिषदेने जागा उपलब्ध करून तात्काळ वस्तीगृहाचे काम सुरू करावे.

यावेळी बैठकीत आ.संदीप क्षीरसागर,  आ. प्रकाश सोंळके, आ. बाळासाहेब आजबे, आ.लक्षमण पवार, आ. विनायक मेटे, आ. संजय दौंड, आ. नमिताताई मुंदडा, जि. प अध्यक्षा सौ. सिरसाट ताई, जि. प. सदस्य. बजरंग बाप्पा सोनवणे, जि. प. सदस्य. विजयसिंह पंडित, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, इतर सर्व विभागांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment